बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालचा दिवस थोडा भावुक होता... जिथे काही खास पाहुणे सदस्यांना भेटायला घरामध्ये गेले. त्यांच्यासोबत रंगल्या गप्पागोष्टी, सदस्यांनी केली थोडी मज्जा मस्ती आणि झाला थोडा राडा... कारण अत्यंत महत्वपूर्ण असा टास्क त्यांच्यासमोर पार पडला आणि तो म्हणजे टेंपटेशन रूममध्ये जाण्याची या सीझनमधील शेवटची सुवर्णसंधी कोणत्या सदस्याला मिळणार?
मीरा आणि उत्कर्षने या टास्कमध्ये बाजी मारली आणि हा बहूमान त्यांना मिळणार असे वाटले आणि बिग बॉस यांनी जाहीर केले ही संधी एकाच सदस्याला मिळणार आहे. त्यामुळे उत्कर्ष टेंपटेशन रूममध्ये जाणारा शेवटचा सदस्य ठरला. ज्याची किंमत मीराला चुकावावी लागली. आज घरामध्ये रंगणार आहे नवा टास्क.. बघूया यामध्ये कोण बाजी मारणार आणि कोण हारणार ?
विकास आणि विशालमध्ये झाला जबरदस्त राडा
आजच्या टास्कमध्ये विकास आणि विशालमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त राडा होणार आहे. घरातील समीकरण बदलताना दिसत आहेत. प्रत्येक सदस्य स्वतंत्र गेम खेळताना दिसणार असे दिसून येत आहे. तर टास्क असा असणार आहे, तात्या यांच्या स्पेसशिपचे इंधन संपले आहे, प्रत्येक सदस्याला त्यांच्या टीममधील सदस्यांच्या मदतीने स्पेसशिपमध्ये इंधन भरायचे आहे आणि यावरूनच पडली विकास आणि विशालमध्ये वादाची ठिणगी. विकासचे म्हणणे आहे तू डायरेक्ट घुसलासच... विशालचे म्हणणे आहे, त्यांची पाईप लाईन पूर्ण झाली गेम ते जिंकले... आणि वाद पुढे वाढतच गेला... नेमके काय घडले हे आजचा बिग बॉस मराठीचा एपिसोड पाहिल्यावर समजेल.