छोट्या पडद्यावरील बहुचर्चित रिएलिटी शो बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनला सुरूवात होऊन एक आठवडा उलटला आहे. आता आव्हाने आणि दुप्पट अडथळे घेऊन काल सुरू झाला स्पर्धेचा दूसरा आठवडा. जोडी की बेडी ही आठवड्याची थीम असून बिग बॉस यांनी सदस्यांच्या जोड्या नेमून दिल्या आणि संपूर्ण आठवडाभर सदस्यांना या जोड्यांसोबतच राहणे अनिवार्य असणार आहे असे जाहीर केले.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बर्याच गोष्टी घडल्या एकेमकांना सल्ले देणे, स्ट्रॅटेजी सांगणे, दुसर्या ग्रुपमध्ये दाखल होणे, असे बरेच काही बघायला मिळाले. तसेच बिग बॉस यांनी सदस्यांनवर “नावं मोठे लक्षण खोटे” हे नॉमिनेशन कार्य सोपावले. ज्यामध्ये या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले जय, गायत्री, विशाल, विकास, आविष्कार, मीनल आणि शिवलीला. काल मीनल आणि स्नेहामध्ये मोठा वाद देखील झाला ज्यामध्ये दोघींनी आपआपले मुद्दे सदस्यांनसमोर मांडले.
आज घरामध्ये हल्ला बोल होणार आहे. हा टास्क नक्की काय असणार आहे ? या टास्क मधून सदस्यांना काय मिळणार आहे ? हे आजच्या भागामध्ये कळेलच.
पण, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून असे दिसून येते आहे की, एका टीम मधील दोन सदस्य त्या मोटर बाईकवर बसणार आहेत आणि दुसर्या टीममधील सदस्य त्यांना उठवण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रोमोमध्ये मोटर बाईकवर बसलेली पहिली जोडी आहे सोनाली आणि सुरेखा कुडची तर दुसरी जोडी आहे विशाल आणि विकास. या बसलेल्या सदस्यांवर पाण्याचा मारा होताना दिसतो आहे, धूर देण्यात येत आहे. म्हणजेच त्यांना त्या मोटर बाईकवरुन उतरवण्यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात येणार आहे. बघूया या हल्ला बोल टास्कमध्ये कोणाची टीम विजयी होणार ? आणि कोणाला हार पत्करावी लागणार.