बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनला सुरूवात होऊन काही आठवडे उलटले आहेत. आता दुसऱ्या आठवड्यात बिग बॉस यांनी सदस्यांनावर हल्लाबोल हे कार्य सोपावले. ज्यामध्ये दोन टीम करण्यात आले आहेत. काल मोटर बाईकर सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील बसल्या होत्या. सुरेखाताई ठामपणे आपला मुद्दा मांडताना दिसल्या. आम्ही इथे आलो आहेत तर आम्ही खेळताना दिसलो पाहिजे, कॅप्टन बनण्याची इतकी हौस नाही आहे. बर्याच चर्चेनंतर सोनाली आणि सुरेखा ताईंसोबत टास्कला सुरुवात झाली.
सुरेखा कुडची आणि सोनाली पाटीलनंतर आता मोटर बाईकवर बसायला आले विकास आणि विशाल. हा टास्क आजच्या भागामध्ये देखील बघायला मिळणार असून हे दोघे किती वेळ बाईकवर बसू शकतात हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. टास्क जिंकण्यासाठी टीममधील सदस्य अनेक फंडे वापरताना दिसणार आहेत. हल्लाबोल टास्कमध्ये विकास आणि विशालला बाईकवरून उठवण्यासाठी विरुध्द टीमचे भरपूर प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणतात ना टास्क के लिये कुछ भी ! दरम्यान नुकताच बिग बॉस मराठी ३चा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. त्यात मीराने विकासला खुले चॅलेंज दिलेले पहायला मिळत आहे.
स्नेहाने आविष्कारला मारला टोमणादरम्यान, आविष्कार विकास आणि विशालला धीर देताना दिसणार आहे, “मी रेडी आहे खेळायला, पण आता तुम्हाला खेळायचे आहे. त्यावर स्नेहा आविष्कारला उद्देशून बोलताना दिसते आहे की जो माणूस स्वत:चा नाही तो तुमचा काय होणार? आता स्नेहाच्या या टोमण्यावर आविष्कार काय उत्तर देणार ? त्यांच्यामध्ये वाद होणार ? हे आजच्या भागामध्ये समजेल.