Join us

Bigg Boss Marathi 3 Episodes, 5 oct: बिग बॉसच्या घरात रंगणार 'माझे मडके भरी' टास्क, कोण कोणाशी घेणार पंगा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 13:24 IST

आज घरामध्ये रंगणार आहे माझे मडके भरी हे उपकार्य

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल काही आगळवेगळे घडताना दिसले. चक्क बिग बॉस यांनी त्यांचा फोन घरामध्ये ठेवला आणि म्हणूनच या आठवड्याची थीम असणार आहे टेलीफोन. जेव्हा जेव्हा या टेलीफोनची रिंग वाजेल तेव्हा घरातील सदस्यांना नवनवीन आव्हनांना सामोरे जावं लागणार आहे असे बिग बॉस यांनी कालच्या भागामध्ये घोषित केले.

काल घरामध्ये रंगले चार्ज करायचा नाय हे नॉमिनेशन कार्य, ज्यामध्ये अक्षय वाघमारे, सुरेखा कुडची, विशाल निकम, स्नेहा वाघ, संतोष चौधरी (दादुस), तृप्ती देसाई हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये  नॉमिनेट झाले. 

आज घरामध्ये रंगणार आहे “माझे मडके भरी” हे उपकार्य. आता हा टास्क नक्की माझे मडके भरी आहे की दुसर्‍यांचे मडके फोडी ? हे आजच्या भागामध्ये कळेलच. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज माझे मडके भरी हे उपकार्य रंगणार आहे.

घरातील भांड्यांची सुविधा जिंकण्यासाठी हे कार्य सोपवण्यात आले आहे. टीम A आणि टीम B मध्ये ही बाजी कोण मारणार ? काय काय राडे होणार ? कोणत्या टीमची मडकी फोडली जाणार ? कोण कोणाशी पंगा घेणार ? हे आजच्या भागामध्ये समजेल.

बिग बॉसच्या घरात स्नेहा वाघचे बर्थडे सेलिब्रेशनबिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सेलिब्रिशेनचा मूड दिसणार आहे. कारण देखील तसे खासच आहे. काल ४ ऑक्टोबर रोजी घरातील सदस्य स्नेहा वाघचा वाढदिवस होता आणि त्याचनिमित्ताने सगळ्या सदस्यांनी तिचा वाढदिवस एकत्र येऊन साजरा केला. तृप्ती देसाई यांनी सगळ्यांच्या वतीने तिला छानसे गिफ्ट देखील दिले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सणासुदीच्या दिवशी, कोणाचा वाढदिवस असेल तर गोडधोड पदार्थ खाण्याची संधी सदस्यांना मिळते आणि त्याचा आनंद या सदस्यांच्या चेहर्‍यावर दिसून येतो. 

टॅग्स :बिग बॉस मराठीस्रेहा वाघगायत्री दातार