बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल साप्ताहिक कार्य सुरू झाले. बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 3) च्या घराचे रूपांतर लिलिपुट नगरात नुकतेच झाले आहे आणि घरातील ८ सदस्य त्या नगरातील जनता असणार आहेत तर नवे आलेले सदस्य हुकूमशहा. आता हे हुकूमशहा देत असलेले कार्य या सदस्यांना करावे लागणार आहे पण ते पूर्ण करताना त्यांची मात्र कसोटी लागणार आहे.
लिलिपुट नगरातील हुकूमशहाआहेत घरामध्ये आलेले नवे तीन सदस्य. म्हणजेच स्नेहा, आदिश आणि तृप्तीताई. हे हुकूमशहा सदस्यांना विविध टास्क देणार असून सदस्यांना ते पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. हुकूमशहांनी दिलेले टास्क हे सदस्य पूर्ण करू शकतील ? काय स्ट्रॅटेजी असेल त्यांची या कार्यामागे ? कारण या टास्क अंती घराला मिळणार आहेत कॅप्टन पदाचे दोन उमेदवार आणि त्या बरोबर येणारी उमेदवारी अत्यंत महत्वाची असणार आहे यात शंका नाही.
तृप्तीताईंनी सोनालीला कार्यामधून केले बाद कार्यामध्ये आज सोनाली आणि गायत्रीला खावी लागणार आहेत कारली आणि ते खात असताना विचित्र तोंड करण्यास मनाई आहे. तसेच ते हात न लावता खायची आहेत. हे कार्य कसे पार पाडतील, हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग पाहावा लागेल. तृप्तीताईंनी सोनालीला कार्यामधून बाद केले आणि तिला उठाबश्या काढण्याची शिक्षा दिली आहे.