Join us

Video: 'पापा किस दुनिया से आते है?'; सोनाली पाटीलची वडिलांसाठी भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 14:04 IST

Sonali patil: सोनाली अनेकदा सोशल मीडियावर काही फोटो किंवा फनी व्हिडीओ शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने एक भावुक पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील (sonali patil). अनेक गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सोनालीला खरी ओळख बिग बॉस मराठी३ मुळे मिळाली. या शोच्या माध्यमातून ती तुफान लोकप्रिय झाली. त्यामुळे अल्पावधीत लोकप्रियता मिळवणाऱ्या या अभिनेत्रीचा आज मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. सोनाली अनेकदा सोशल मीडियावर काही फोटो किंवा फनी व्हिडीओ शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने एक भावुक पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.

कायम मजेदार पोस्ट शेअर करणाऱ्या सोनालीने यावेळी तिच्या वडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टमधून ती वडिलांना किती मिस करते हे दिसून येतं. 

सोनालीने इन्स्टाग्रामवर एक फोटो कोलाज केलेला व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने दिलेलं कॅप्शन सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. कोई तो बताय यार....ये पापा किस दुनिया से आते है ? ...., असं कॅप्शन तिने या व्हिडडिओला दिलं आहे.

दरम्यान, सोनालीची ही पोस्ट पाहिल्यावर सगळेच जण भावुक झाले. अनेक चाहत्यांनी तिला कमेंटच्या माध्यमातून सावरण्याचा सल्ला दिला.  बिग बॉस मराठीमुळे घराघरात पोहोचलेली सोनाली पाटील मुळची कोल्हापूरची आहे. सोनाली शॉर्ट व्हिडिओसाठी प्रसिध्द असून तिला TikTok गर्ल म्हणूनही ओळखलं जातं. सोनालीने 'जुळता जुळता जुळतयं की', घाडगे अँड सून, देव पावला, 'देवमाणूस' आणि 'वैजू नं.१' यासारख्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार