‘बिग बॉस मराठी 3’मध्ये (Bigg Boss Marathi 3) गेल्या आठवड्यात स्रेहा वाघ, आदिश आणि तृप्ती देसाई या तीन सदस्यांनी एन्ट्री झाली. हे नवे सदस्य बिग बॉसच्या घरात हुकूमशहा बनले होते. या हुकुमशहांनी गेला संपूर्ण आठवडा चांगलाच गाजवला. अगदी एलिमनेशन टास्क असो, साप्ताहिक कार्य असो वा कॅप्टन्सी टास्क आठवडाभर हुकूमशहांनी घरात अक्षरश: धुमाकूळ घातला. या तीन सदस्यांच्या एन्ट्रीनंतर घरातून एक सदस्य बाद होणार, हे ठरलं होतंच. गायत्री दातार, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ आणि सोनाली पाटील या आठवड्यात या आठवड्यात नॉमिनेट झाले होते. काल मीरा जगन्नाथ सेफ असल्याची घोषणा महेश मांजरेकरांनी केली होती. सरतेशेवटी गायत्री आणि सोनाली डेंजर झोनमध्ये होत्या. या दोघींपैकी कोण बाद होणार, हा प्रश्न होता. तर गायत्री दातार ( Gayatri Datar ) घरातून बाद झाली आहे. आता बिग बॉस मराठीच्या घरात टॉप 7 सदस्य उरले आहेत. हे टॉप 7 सदस्य हा आठवडा कसा गाजवतात, तेही कळणार आहे.
ग्रँड फिनालेमध्ये जाणारी मीनल शाह पहिली स्पर्धक ‘जो जिता वही सिकंदर’ या कॅप्टन्सी टास्कमध्ये घरातील पात्र सदस्यांसोबतच अपात्र सदस्यांनादेखील उमेदवारी मिळत असल्याचं बिग बॉसने गुरुवारी जाहीर केलं. त्यामुळे शेवटचं कॅप्टनपद कोणाला मिळणार आणि कोण बिग बॉसच्या घराचा शेवटचा कॅप्टन बनणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.अखेर या टास्कमध्ये मीनल शाहने बाजी मारली आहे. त्यामुळे घरातील शेवटचे कॅप्टनपद तिला मिळालं आहे. त्यासोबतच बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये जाणारी ती पहिली स्पर्धक ठरली आहे.
उत्कर्ष स्नेहामध्ये शाब्दिक चकमकगेल्या एपिसोडमध्ये उत्कर्ष स्नेहामध्ये झाली शाब्दिक चकमक उडाली. शिवाय मीनल आणि विशाल यांच्यातही नवा वाद निर्माण झाला. विशालच्या एका चाहत्याने त्याला मीनलची चुगली सांगितली. विशाल सगळं फक्त कॅमेºयासाठी करतो, असं मीनलने म्हटल्याचं त्याला समजलं. त्यामुळे इतक्या दिवसांची विशाल आणि मीनलची मैत्री पणाला तर लागणार नाही ना ? असा प्रश्न आहे. या आठवड्यात याचेही उत्तर मिळणं अपेक्षित आहे.