Join us

Bigg Boss Marathi 3 Episodes, 23 Oct: 'तुमच्यासोबत बोलायची अजिबात इच्छा नाही', घरातील सदस्यांना असे का म्हणाले महेश मांजरेकर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 6:04 PM

Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या चावडीमध्ये आज महेश मांजरेकर घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहेत.

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या सीझनमधील सदस्यांचे आता खरे स्वभाव हळूहळू प्रेक्षकांसमोर येत आहेत. घरात दोन ग्रुप पहायला मिळत आहेत. दररोजच्या टास्कदरम्यान आणि घरातील कामादरम्यान घरात सदस्यांमध्ये वारंवार भांडणे, बाचाबाची पहायला मिळते आहे. (Bigg Boss Marathi 3)दरम्यान आज बिग बॉसची चावडी असून शोचे होस्ट महेश मांजरेकर घरातील सदस्यांची शाळा घेणार आहेत. 

नुकताच कलर्स वाहिनीने बिग बॉस मराठी ३चा आजच्या एपिसोड्सचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर सदस्यांवर नाराज झालेले दिसत आहेत. ते प्रोमोत बोलताना दिसत आहेत की, या सीझनमधील स्पर्धक इम्युनिटी मिळवण्यासाठी स्वतःची ह्युमॅनिटी घालवून टाकत आहेत. कोण आहे खरे आणि कोण आहे खोटे. कोण आहे रावडी हे आजच्या बिग बॉसच्या चावडीत पहायला मिळणार आहे. 

आजच्या भागाचा आणखी एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यात महेश मांजरेकर बोलत आहेत की, हा तिसरा सीझन आहे पण इतका मी त्रस्त कधीच झालो नव्हतो. जेवढा मी या सीझनमध्ये झालो. आठवडाभर नुसते राडे बस्स. त्यामुळे मला तुमच्याशी अजिबात बोलायची इच्छा नाही आहे. सीयू बाय. महेश मांजरेकर असे का म्हणाले हे आजच्या भागात कळेल.

टॅग्स :बिग बॉस मराठीमहेश मांजरेकर