Join us

‘Bigg Boss Marathi 3 ’मध्ये पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे हा नवा सदस्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 11:28 AM

Bigg Boss Marathi 3 : नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून एक पुरुष स्पर्धक वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेत असल्याचं दिसत आहे.

ठळक मुद्देनव्या एन्ट्रीने बिग बॉसच्या घरातील अनेक समीकरणं बदलणार हे नक्की. तो कोणत्या गटात जातो आणि घरातील सदस्यांना किती पुरून उरतो, हे लवकरच तुम्ही पाहू शकणार आहात.

बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझनही  (Bigg Boss Marathi 3 ) आधीच्या दोन सीझनसारखा लोकप्रिय ठरतोय. ग्रँड प्रीमिअरला 15 मराठी सेलिब्रिटींनी घरात धडाकेबाज एन्ट्री घेतली होती. यात विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांचा समावेश होता. मात्र, आठवडाभरातच प्रकृती कारणास्तव शिवलीला बाहेर पडली आहे. आता याच शिवलीलाची जागा भरायला एक नवा सदस्य बिग बॉस मराठीच्या घरात येतोय.  आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये हा नवा सदस्य घरात एण्ट्री करेल. हा स्पर्धक कोण असणार, याबद्दल चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. या सदस्याचा एक प्रोमो जारी करण्यात आला आहे.

दमदार नृत्याने या सदस्याची एन्ट्री होताना प्रोमोमध्ये दिसतेय. अर्थात त्यात त्याचा चेहरा दिसत नाही. हा सदस्य कोण, सध्या वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. चर्चा खरी मानाल तर हा सदस्य आदिश वैद्य  ( Adish Vaidya)  असल्याचं कळतंय.आदिशला तुम्ही ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत बघितलं असेल. काही हिंदी मालिकांमध्येही त्याने काम केलंय.

आदिश वैद्य मराठी टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय नाव आहेत.  ‘रात्रीस खेळ चाले’च्या पहिल्या सीझनमध्ये तो दिसला होता. याशिवाय,  कुंकू टिकली आणि टॅटू, ह्यजिंदगी नॉट आऊट  सारख्या प्रसिद्ध शोमध्ये त्याने काम केले आहे. ह्यसेक्स वेब ड्रग्स आणि थिएटर  या मराठी वेब सीरिजमध्येही तो झळकला आहे. सध्या तो ‘गुम है किसी की प्यार मे’ या हिंदी मालिकेत दिसत होता. मात्र, नुकतीच त्याने ही मालिका सोडली आहे. आता आदिश वैद्यच्या एन्ट्रीने बिग बॉसच्या घरातील अनेक समीकरणं बदलणार हे नक्की. तो कोणत्या गटात जातो आणि घरातील सदस्यांना किती पुरून उरतो, हे लवकरच तुम्ही पाहू शकणार आहात.

टॅग्स :बिग बॉस मराठी