बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज उत्कर्ष, स्नेहा आणि जय एका गोष्टीवर चर्चा करताना दिसणार आहेत. ज्यामध्ये उत्कर्ष त्याचे मत मांडताना म्हणणार आहे. “Play like a player”. नक्की ही चर्चा का आणि कशावरून सुरू झाली ? हे आजच्या भागामध्ये आपल्याला कळेलच. पण एवढं नक्की की घरातील सगळीच समीकरण हळूहळू बदलताना दिसतं आहेत. तिघांची चर्चा सुरू असताना स्नेहाचं म्हणण जयने उत्कर्षला सांगताना म्हणाला, तिचं म्हणण आहे की मीरा आणि गायत्रीने परत तेच केलं जे त्यांनी सुरेखा यांच्या बरोबर झालं होतं. तर मी तिला तेचं म्हंटलं की बिग बॉस सगळ्यांना समान संधी देतात.वेट फॉर यूर टर्न. आज जर तू कॅप्टन झालीस तर मग सहा ते सात दिवस बॉल इज इन यूर कोर्ट.” उत्कर्षचे त्यावर म्हणणे आहे “मला काय पटतं सांगू का मी स्पर्धक म्हणून सांगतो, “Play like a player”.
सदस्यांना पुन्हा एकदा मिळणार संधी शक्तीपदक पटकविण्याची... काल समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी घरामध्ये जाहिर केले, “जे दोन सदस्य सर्वात आधी बिग बॉसने सांगितलेल्या रूममध्ये पोहचतील ते शक्तीपदक मिळविण्यासाठीचे उमेदवार ठरतील. आणि ती रूम आहे कन्फेनशन रूम.” बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टन्सी टास्क सुरू झाला.
टीमने स्नेहा वाघ आणि तृप्ती देसाई यांना कॅप्टन पदाचे दोन उमेदवार घोषित केले. आता या दोघींमध्ये कोण बनणार घरचा नवा कॅप्टन ? हे आजच्या भागामध्ये कळेलच. याचसोबत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बरीच वादावादी बघायला मिळाली. घरामध्ये जरी दोन स्ट्रॉंग ग्रुप असले तरीदेखील ग्रुपमधील सदस्यांमध्ये तितकासा एकेमकांबद्दल विश्वास दिसून येत नाही.