Join us

Bigg Boss Marathi 3:“ ती उगाच रागवायचे नाटक करतेय ”  उत्कर्ष शिंदेने साधला या सदस्यावर निशाणा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 13:36 IST

Bigg Boss marathi 3: च्या घरात घरातील सगळ्यात स्ट्रॉंग टीम उत्कर्ष, मीरा, गायत्री, जयमध्ये गैरसमजामुळे दुरावा आल्याचा दिसतो आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल एक सदस्य घराबाहेर पडला तर एका सदस्याची घरामध्ये एंट्री झाली. आविष्कारला काल घराबाहेर पडावे लागले तर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झाली सिझनची दुसरी वाईल्ड कार्ड एंट्री नीथा शेट्टी – साळवी. नव्या सदस्याच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलणार ? हे तर हळूहळू समजेलच पण, घरातील सगळ्यात स्ट्रॉंग टीम उत्कर्ष, मीरा, गायत्री, जयमध्ये गैरसमजामुळे दुरावा आल्याचा दिसतो आहे. स्नेहाच्या येण्याने असे झाले असावे का की चुगलीमुळे की आधीपासूनच याची सुरुवात झाली होती ? त्याचे नक्की कारण काय असेल हे जेव्हा ते स्पष्टपणे बोलतील तेव्हा कळेलच. 

काल एका चुगलीमुळे गायत्रीला धक्का बसला आहे आणि तिचे डोळे आता उघडले आहेत असे तिने महेश मांजरेकर यांना बोलताना सांगितले.आज उत्कर्ष, स्नेहा आणि जय मीरा आणि गायत्रीवरुन चर्चा करताना दिसणार आहेत.जय उत्कर्ष आणि स्नेहाला म्हणाला, गायत्रीने यामध्ये एक मूर्खपणा केला मी तुला सांगतो ना. उत्कर्षचं म्हणण पडलं सर मागच्या वेळेस बोलले होते खड्डा तुम्ही स्वत:साठी खोदता आहेत लक्षात घ्या. 

जय म्हणाला आता तिने काय केलं सरांनी सांगितले तू फेन्सवर बसू नको तू एकतर लेफ्टला उडी मार नाहीतर राईटला उडी मार, या बाईने तिकडेच उडी मारली. उत्कर्षचे म्हणणे आहे हे शांत झालं पाहिजे. मीराचा वेगळाच गेम सुरू आहे. जय म्हणाला तिला सांग गेम तिच्याकडेच ठेव, हा गेम इकडे चालणार नाही. उत्कर्ष म्हणाला ती म्हणते मी अॅक्टिंग करतेय. परवा ती मला म्हणाली मी रागवायची अॅक्टिंग करतेय. मी माझा वेगळा गेम खेळणार आहे, पण माझा तुला पाठिंबा असेल. पण आता असं झाला आहे तू जर अॅक्टिंग करते आहेस तर मला सांग ना, मला कळणार कसं ?नक्की मीराच्या मनामध्ये आहे तरी काय ? कोणता गेम खेळते आहे मीरा ? काय सांगायचे आहे तिला उत्कर्षला ? जसजसे दिवस पुढे जातील तसं हेदेखील कळेलच. 

टॅग्स :बिग बॉस मराठी