Join us

मी वारकरी संप्रदायाची माफी मागते..., बिग बॉसमध्ये जाण्यावरून शिवलीला पाटील यांची क्षमायाचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 11:01 AM

Bigg Boss Marathi 3, Shivlila Patil : ‘बिग बॉस मराठी3’मध्ये एन्ट्री घेतलेल्या एका स्पर्धकाने जाताक्षणीच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ते नाव म्हणजे महाराष्ट्राच्या प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटील.

ठळक मुद्दे शिवलीला या महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय महिला कीर्तनकार आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे शिवलीला पाटील यांचे मूळ गाव.

बिग बॉस मराठी3’मध्ये (Bigg Boss Marathi 3)  एन्ट्री घेतलेल्या एका स्पर्धकाने जाताक्षणीच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ते नाव म्हणजे महाराष्ट्राच्या प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटील (Shivlila Patil). बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्या चर्चेत होत्या. कारण त्यांचं बिग बॉस सारख्या शोमध्ये जाणं अनेकांना रूचलं नव्हतं. यावरून शिवलीला ट्रोलही झाल्या होत्या. आजारी असल्याचं कारण देत त्या शोमधून काहीच दिवसांत बाहेर पडल्या. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर आता त्यांनी तमाम लोकांची आणि वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सर्वांची जाहीर माफी मागितली. ‘माझ्या ‘बिग बॉस मराठी 3’मध्ये जाण्याच्या निर्णयाने वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते. माझा मार्ग चुकला असेलही. पण हेतू शुद्ध होता. यापुढे ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय असा निर्णय घेणार नाही,’ असं त्या म्हणाल्या.

‘माझ्या बिग बॉसमध्ये जाण्याच्या निर्णयाने माझा वारकरी संप्रदाय आणि माझे ज्येष्ठ माझ्यावर नाराज आहेत. मी दोन्ही हात जोडून आणि नतमस्तक होत माफी मागते. माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे, हाच शुद्ध हेतू होता. मी निवडलेला मार्ग चुकीचा असला तरी उद्देश प्रामाणिक होता,’ असे त्या म्हणाल्या. ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात टिकून राहण्यासाठी सर्व स्पर्धकांना कोणकोणत्या दिव्यातून जावं लागतं हे तुम्ही जाणताच. रोज नवे टास्क खेळावे लागतात. प्रत्येक स्पर्धकाप्रमाणे शिवलीला यांनाही टास्क करावा लागला.  नेहमी व्यासपीठावर उभं राहून किर्तन करणाºया शिवलीलांना टास्क खेळताना पाहून नेटकºयांनी त्यांना ट्रोल केलं होतं. चुकीचा निर्णय घेतला ताई, बिग बॉस हा फालतू अड्डा आहे, लोका सांगे ब्रह्म ज्ञान, स्वत: कोरडे पाषाण, अशा काय काय प्रतिक्रिया त्यांच्या या निर्णयावर उमटल्या होत्या. शिवलीला या महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय महिला कीर्तनकार आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे शिवलीला पाटील यांचे मूळ गाव. सोशल मीडियावरची त्यांची कितर्न विशेष प्रसिद्ध आहेत. संत साहित्या, संस्कृती विषयावरचे सोशल मीडियावरचे त्यांच्या किर्तनाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. 

टॅग्स :बिग बॉस मराठी