‘बिग बॉस मराठी 3’मध्ये (Bigg Boss Marathi 3) गेल्या दोन दिवसांत प्रचंड राडा पाहायला मिळाला. ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ या कॅप्टन्सी कार्या दरम्यान काल घरामध्ये जोरदार राडा झाला. या टास्कमध्ये प्रचंड धक्काबुक्की झाली. नियम धाब्यावर बसवले गेलेत. यामुळे बिग बॉसनी अगदी कडक शब्दांत सदस्यांची कानउघडणी केली. जय, उत्कर्ष, विकास, आदिश यांना सक्त ताकीदही दिली. शिवाय विशालने बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टीचं नुकसान केलं म्हणून त्याला थेट पुढील आठवड्याच्या घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केलं. हा टास्क संपला अन् रात्रीच्या दिव्यांच्या प्रकाशात स्रेहा वाघ (sneha wagh) आणि जय दुधाणे (jay dhudhane) एकमेकांशी मस्ती करताना दिसले. सध्या सोशल मीडियावर याच व्हिडीओची चर्चा आहे. दोघांमध्ये नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना पडला आहे.
व्हिडीओत जय आणि स्रेहा किचनमध्ये आहेत. दोघेही मस्तीच्या मूडमध्ये आहेत. गमतीगमतीत स्रेहा जयला मारते काय, जय तिला अडवतो काय, असा हा व्हिडीओ आहे. स्रेहा रात्रीची भांडी घासत असताना जय त्याचा कप घेण्यासाठी तिथे येतो. परंतु, स्नेहा त्याला अडवते. तेव्हा ते एकमेकांची मस्ती करू लागतात. गेल्या काही भागांपासून स्नेहा आणि जय यांमध्ये जवळीक वाढत असल्याचं दिसून येत आहे.
चाहते म्हणाले,नुसता पांचटपणा चाललाय...