Bigg Boss Marathi 3: 'आपलेच मित्र आपल्या....' घरात परतताच स्नेहा वाघने 'या' सदस्याची घेतली शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 03:54 PM2021-12-06T15:54:11+5:302021-12-06T16:17:14+5:30

छोट्या पडद्यावरील कॉन्ट्रोव्हर्शिअल शो म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जातं. '

Bigg Boss Marathi 3: Sneha wagh entry in bbm3 actress targets jai dudhane | Bigg Boss Marathi 3: 'आपलेच मित्र आपल्या....' घरात परतताच स्नेहा वाघने 'या' सदस्याची घेतली शाळा

Bigg Boss Marathi 3: 'आपलेच मित्र आपल्या....' घरात परतताच स्नेहा वाघने 'या' सदस्याची घेतली शाळा

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील कॉन्ट्रोव्हर्शिअल शो म्हणून बिग बॉसची ओळख आहे. 'बिग बॉस मराठी ३' ही याला अपवाद नाही. घरात होणारे वाद-विवाद काही नवीन नाहीत. 'बिग बॉस मराठी ३' हा शो आता अंतिम टप्प्यात आहे. साहजिकच बिग बॉस मराठी 3 चा विजेता कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शो अंतिम टप्प्यात असताना आता एक नवा ट्विस्ट आला आहे. घरातून बाहेर पडलेले स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांची घरात पुन्हा एंट्री झाली आहे. 

घरात एंट्री झाल्यावर स्नेहा वाघने तिचा घरातील जुना मित्र जय दुधाणेवर निशाणा साधला. स्नेहा म्हणाली,“या घरात सुरुवातीपासूनच जो कोणी माझ्याशी गेम खेळत होता तो फक्त जय दुधाणे होता. आपलेच मित्र आपल्या मागून आपलीच एवढी इज्जत नाही काढतं....” असे म्हणत प्रोमोमध्ये नाराजी व्यक्त करताना दिसते आहे.


 
स्नेहाने जयवर आरोप केल्यानंतर जया भावूक झालेला दिसतोय. त्याला उत्कर्ष आणि मीरा समजवताना दिसतायेत. मीरा जयला हा ही टास्कचा एक भाग आहे वाईट वाटून नको घेऊ असे सांगताना दिसतेय. तर उत्कर्ष म्हणतो,“चुका मान्य कराव्याचं लागतील. जे आपल्याला माहिती आहे की आपण केल्या त्या मान्यचं केल्या पाहिजेत. पुढे कसं खेळायचं आहे आपल्याला माहिती आहे ना. आता लगेच जाऊन तिला सॉरी बोलण्याची गरज नाही. तूर्तास बिग बॉस मराठीचा हा भाग पाहिल्यानंतर कितने अजीब रिश्ते है यहा पर याच गाण्याच्या ओळी आठवल्याशिवाय राहणार नहीत. बिग बॉस मराठीचे घर स्पर्धकांसोबत रसिकांसाठी फुल ऑन सरप्राईज ठरले. आता हे तीन नवे सदस्य घरामध्ये गेल्यावर अजून काय काय घडणार हे पाहणे नक्कीच रंजक असणार आहे. 

Web Title: Bigg Boss Marathi 3: Sneha wagh entry in bbm3 actress targets jai dudhane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.