छोट्या पडद्यावरील कॉन्ट्रोव्हर्शिअल शो म्हणून बिग बॉसची ओळख आहे. 'बिग बॉस मराठी ३' ही याला अपवाद नाही. घरात होणारे वाद-विवाद काही नवीन नाहीत. 'बिग बॉस मराठी ३' हा शो आता अंतिम टप्प्यात आहे. साहजिकच बिग बॉस मराठी 3 चा विजेता कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शो अंतिम टप्प्यात असताना आता एक नवा ट्विस्ट आला आहे. घरातून बाहेर पडलेले स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांची घरात पुन्हा एंट्री झाली आहे.
घरात एंट्री झाल्यावर स्नेहा वाघने तिचा घरातील जुना मित्र जय दुधाणेवर निशाणा साधला. स्नेहा म्हणाली,“या घरात सुरुवातीपासूनच जो कोणी माझ्याशी गेम खेळत होता तो फक्त जय दुधाणे होता. आपलेच मित्र आपल्या मागून आपलीच एवढी इज्जत नाही काढतं....” असे म्हणत प्रोमोमध्ये नाराजी व्यक्त करताना दिसते आहे.