बिग बॉसच्या घरात (bigg boss marathi 3) लवंगी मिरची म्हणून वावरणारी स्पर्धक म्हणजे सोनाली पाटील. आपल्या बोलण्यातून, टास्क खेळण्यातून सोनालीमधील कोल्हापुरी ठसका कायमच प्रेक्षकांना दिसत असतो. अरेला कारे करणारी सोनाली (sonali patil) तिच्या याच अंदाजामुळे प्रेक्षकांची आवडती स्पर्धक आहे. परंतु, सध्या प्रत्येकाला कोल्हापुरी ठसका दाखवणाऱ्या सोनालीच्या डोळ्यात पाणी तरळल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे तिच्याच टीममधील एक सदस्यामुळे सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
आज रंगणाऱ्या बिग बॉसच्या नव्या भागात सोनाली घरात रडताना दिसणार आहे. विशेष म्हणजे सोनालीची जवळची मैत्रीण मीनलमुळे तिच्या डोळ्यात पाणी आल्याचं पाहायला मिळणार आहे. परंतु, मीनल आणि सोनाली यांच्यात झालेला गैरसमज विकास दूर करणार आहे. विकास, सोनालीची समजूत काढणार आहे.
Bigg Boss Marathi 3, Episodes,12 Nov : 'माझं प्रेम असंच आहे'; स्नेहासमोर विशालने दिली कबुली
“ठीक आहे मीनलच्या बाबतीत काही गोष्टी आहेत. पण आता तुमच्या दोघींमध्ये नक्की काय सुरु आहे. कुठल्या पॉइंटवरुन सुरू झालं आहे ? काय झालं आहे? ते कळतचं नाहीये. ह्यांच्या बोलण्याने किंवा हे कसे react होत आहेत. आणि, लोकांना जर हे दिसत आहे की, तू genuine आहेस आणि तुला समोरून तितकसं मिळत नाहीये... तर उलट मग तुझा फायदा होतो आहे ना ? sympathy तुझ्याकडे येते आहे. ही पोरगी एवढी प्रयत्न करते आहे, असं म्हणत विकास सोनालीची समजूत काढतो.
"हे बघ आणि हे वाक्य बघ..किती मोठं वाक्य आहे", असं सोनाली गळ्यातली पाटी दाखवत म्हणते. त्यावर विकास म्हणाला, "पण सोनाली हा चॉइस तुझ्याकडे होता ना, ते गळ्यात घालायचे की नाही... हा चॉइस तुझा आहे ना ? नाही म्हणू शकली असतीस...".
दरम्यान, आता विकासने समजावल्यानंतर सोनाली पुढे काय बोलणार? मीनलविषयी निर्माण झालेला तिचा गैरसमज दूर होणार का? या प्रश्नांची उत्तर आता येत्या भागातच प्रेक्षकांना मिळणार आहेत.