‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन (Bigg Boss Marathi 3) रंगात आला असताना काल रविवारी बिग बॉसच्या घरातील एक स्पर्धक घराबाहेर पडला.(Bigg Boss Marathi 3 Elimination) होय, गेल्या आठवड्यात सुरेखा कुडची (Surekha Kudachi), स्रेहा वाघ, संतोष चौधरी, सोनाली पाटील आणि विकास पाटील, तृप्ती देसाई आणि विशाल निकम असे सात सदस्य नॉमिनेट झाले होते. शनिवारी चावडीमध्ये यापैकी तृप्ती देसाई आणि विशाल निकम हे दोघे सेफ झालेत. त्यानंतर सोनाली पाटील आणि विकास पाटील सेफ झालेत. दादूस अर्थात संतोष चौधरी हा देखील सेफ झाला. यानंतर सुरेखा कुडची आणि स्नेहा वाघ अशा दोघी उरल्या होत्या. या दोघींमधून कोण घराबाहेर पडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर महेश मांजरेकरांनी निकाल दिला आणि सुरेखा कुडची हिचा ‘बिग बॉस मराठी 3’ मधील प्रवास संपुष्टात आला. सुरेखा घराबाहेर जाणार हे ऐकताच, सर्व स्पर्धकांना अश्रू अनावर झालेत. विशेषत: स्रेहा आणि जय या दोघांच्या अश्रूंचा बांध फुटला.
घरामध्ये काहीतरी जादू आहे...घराबाहेर जाताना मी रडणार नाही, असं सुरेखा कुडची हिने ठरवलं होतं. पण घराबाहेर जाण्याची वेळ आली तेव्हा तिच्याही डोळ्यांत अश्रूंनी गर्दी केली. ‘या घरामध्ये माणूस म्हणून कोणीच वाईट नाही. परिस्थितिमुळे होतं तसं. मी ठरवलं होतं जेव्हा मी एलिमनेट होईन तेव्हा मी रडणार नाही. पण या घरामध्ये काहीतरी जादू आहे, असं म्हणत तिने घराचा रडत रडत निरोप घेतला.सुरेखा कुडची उत्तम अभिनेत्री आहे. टीव्ही सीरियल्स आणि चित्रपट यामधून तिने आपली चुणूक दाखवली आहे. तसंच ती उत्तम डान्सही करते. बिग बॉसच्या घरात येतानाही तिने सादर केलेली लावणी लोकांच्या अजूनही लक्षात आहे. मात्र घरात रंगणा-या टास्कमध्ये ती फार सक्रिय दिसली नाही.
तृप्ती देसाई नवी कॅप्टनजाता जाता महेश मांजरेकरांनी सुरेखाला नवा कॅप्टन निवडण्याचा विशेषाधिकार दिला. सुरेखाने या अधिकारानुसार तृप्ती देसाई यांना कॅप्टन बनवले. त्यामुळे आजपासून एक आठवडा तृप्ती देसाई बिग बॉस मराठी 3 च्या कॅप्टन असतील.