Join us

Bigg Boss Marathi 3: '...तर उत्कर्षनं कमावलेलं सर्व गमावून बसेल', गायत्री दातारनं व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 17:41 IST

Bigg Boss Marathi 3 : गायत्रीला उत्कर्षच्या काही गोष्टी खटकतात.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पार पडणार्‍या नॉमिनेशन कार्यामध्ये टॉप ८ सदस्यांना घरात आलेल्या नव्या सदस्यांना हे पटवून द्यायचे आहे की का ते घरात रहाण्यास पात्र आहेत आणि दूसरा सदस्य अपात्र आहे. आणि त्यासाठीच आज घरामध्ये चर्चा रंगणार आहे.

सदस्य त्यांचा मुद्दा पटवून देताना दिसणार आहेत. विशालने ज्याप्रमाणे त्याचे मीराबद्दलचे मत स्नेहासमोर मांडले त्याचप्रमाणे गायत्री तिचा मुद्दा तृप्ती ताईंना सांगताना दिसणार आहे. गायत्रीचे म्हणणे आहे, उत्कर्ष खरंतर चांगले आहेत, चांगले प्लेयर आहेत. फक्त त्यांच्या काही काही गोष्टी आहेत ज्या खटकतात. एक म्हणजे चांगले असून ते काही लोकांबरोबर खेळून उगाचंच त्यांच्या मागेमागे जाऊन स्वत:पण निगेटिव्ह लाईटमध्ये येतात. सरदेखील म्हणाले घरात बुगुबुगू तर उत्कर्षच आहेत. कारण, मीरा बरोबर राहून काय होतं ते मला चांगलंच माहिती आहे, तेच त्यांच्याबरोबर आता होते आहे माझ्या मते त्याच्यामधून त्यांना जागे करण्यासाठी हे करू नको... तसे नाही केले तर आतापर्यंत जे कामावले आहे ते गमावशील... असे मला कुठेतरी वाटते.

टॅग्स :बिग बॉस मराठीगायत्री दातार