बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) घरात टास्कसोबतच स्पर्धकांमध्ये गप्पा, मज्जामस्ती सुरु असल्याचंही पाहायला मिळतं. सध्या घरात दोन गट पडल्यामुळे दोन्ही गटांमधील स्पर्धक आपआपल्या टीममध्ये मज्जा करत असतात. यामध्येच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उत्कर्ष (utkarsha shinde), मीरा (meera jagnnath) आणि तृप्ती देसाई (trupti desai) बिग बॉसच्या घरातील सासूबाईंविषयी चर्चा करत आहेत. त्यांच्यातील ही चर्चा ऐकल्यावर या नव्या सासूबाई कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये उत्कर्ष, गायत्री, मीरा आणि तृप्ती देसाई हे चौघे जण किचनमध्ये काम करत असून त्यांची सासू-सुनेविषयी चर्चा सुरु आहे.
उत्कर्ष आणि मीरा स्वयंपाक घरात काम करत असताना गायत्री आणि तृप्ती देसाई डब्यात पीठ भरायचं काम करत होत्या. यावेळी काम करण्याच्या पद्धतीवरुन त्या दोघी एकमेकांना सासू-सून असल्याचं म्हणत होत्या. यावर उत्कर्षनेदेखील सासू-सुनेवर एक गाणं तयार केलं.
"सासूबाई पीठ भरताना सांडतंय माझ्याकडून", असं गायत्री म्हणते. त्यावर "ठीक आहे. शिकतेस ना तू सांडू डे.."असं तृप्ती देसाई म्हणतात. यावर "तुम्ही सुद्धा सांडताय सासूबाई", असं उत्तर गायत्री देते. विशेष म्हणजे त्यावर ''तुला एक नियम म्हणजेच पद्धत शिकवते", असं तृप्ती देसाई म्हणाल्यावर 'संचालकाला नियम?' असा प्रतिप्रश्न गायत्री विचारते.
Bigg Boss Marathi: 'मी एकटी जरी असले तरी...'; जयला स्नेहाने दिलं ठामपणे उत्तर
दरम्यान, या दोघींच्या या संभाषणावर उत्कर्ष गाणं तयार करतो. विशेष म्हणजे या गाण्यातून तो अप्रत्यक्षरित्या दोघींनाही टोला लागवतो. “सासू सुनेचे भांडण... सुनबाई फटकळ तोंडानं, सासू सुनेला माराया धावली... कडाडून सुनबाई सासुला चावली.. अशा आशयाचं गाणं उत्कर्ष तयार करतो.