Join us

Bigg Boss Marathi 3 Upadate:बाप बाप होता है, जय VS विकास स्पर्धक एकमेकांसाठी ठरतायेत डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 18:08 IST

घरात रंगलेल्या टास्कमध्ये जय – विकासचे मोठे भांडण बघायला मिळार आहे.

'ही पाइपलाईन तुटायची नाय’ या साप्ताहिक कार्यामध्ये कॅप्टन्सीसाठी कुठले दोन उमेदवार मिळणार याची चर्चा आणि प्लॅनिंग बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चांगलचं रंगत आहे. आज मीनल आणि विकास याचबाबतीत चर्चा करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे जय आणि विकासमध्ये मोठा राडा होणार आहे.मीनल विकासला सांगणार आहे. तर दुसरीकडे घरात रंगलेल्या टास्कमध्ये जय – विकासचे मोठे भांडण बघायला मिळार आहे. यामध्ये विशाल आणि विकासमध्ये मतभेद झाले तर दुसरीकडे सोनाली आणि विकासमध्ये बाचाबाची झाली. ज्यामध्ये सोनालीने विकासवर आरोप केला की तू माझ्यासाठी खेळला नाहीस. यापुढे ती असेदेखील म्हणाली की, मी तुझ्यासाठी नक्की खेळणार.

टास्क दरम्यान, दोघांमध्ये जोरदार भांडण होणार आहे. जय विकासला सांगणार आहे, तू शब्द सांभाळून वापर.विकासचं त्यावर रोखठोक उत्तर, येडामध्ये काय प्रॉब्लेम आहे.तू काय काय बोलतो ते सांगू. जयने विकासला विचारलं, तू एकटा शहाणा आहेस का रे ? त्यावर विकास म्हणाला, हो मी एकटा शहाणा आहे, दीड शहाणा नाही दोन शहाणा आहे. यावर विकासला जयने सल्युट केला.विकास म्हणाला, बाप बाप होता है.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत आज टास्कमध्ये मीरा आणि सोनालीमध्ये चांगलच राडा झाला आहे असे दिसले. मीरा आणि सोनाली मध्ये हाणामारी का झाली. हे आजच्या भागामध्ये समजेलच पण, मीरा असं देखील म्हणताना दिसणार आहे की, बिग बॉस मला हिच्यापासून धोका आहे. त्यावर विकास म्हणाला, सोनाली ती नाटक करते आहे धरून ठेव तिला.त्यावर जय चिडून म्हणाला तू शांत बसं विकास. मीराचं वाक्य आहे “आईशप्पथ सांगते आहे, बिग बॉस प्लीस थांबवा. नाहीतर ही गेली आज. आगामी भागात घडणाऱ्या  घडामोडी आणखी रंजक असणार हे मात्र नक्की.

टॅग्स :बिग बॉस मराठी