Join us

Bigg Boss Marathi 3 Upadate: गायत्री दातार झाली भावूक,भावाने दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 17:11 IST

Bigg Boss Marathi 3 Upadate: भांडणे, काळजी, प्रेम, घरची आठवण अशा संमिश्र भावना स्पर्धकांकडून व्यक्त होत असतानाच बिग बॅासच्या घरात यावेळी फॅमिली वीक साजरा करण्यात आला.

बिग बॉस मराठीच्या तिस-या पर्वाची सगळीकडेच खूप चर्चा पाहायला मिळत आहे.बिग बॉस मराठी या रियालिटी शोने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. पहिला आणि दुसरा सीझसोबत तीसरा सीझनही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन आता उत्तरार्धाकडे चालला आहे. ‘बिग बॅास मराठी ३’ चा खेळ आता दिवसेंदिवस अधिकच रंगतदार, आव्हानात्मक होत चालला आहे.

बिग बॉसच्या घरात नेहमीच काही ना काही घडामोडी घडत असतात. मग ते सेलिब्रिटी स्पर्धक असलेल्या सदस्यांमधील वाद असो किंवा कडाक्याचे भांडण. घरातील सदस्यांमधील तू-तू-मैं-मैं बरोबर त्यांच्यातील रोमान्स, अफेअर आणि भावनिक नातंही वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. बिग बॉसचं घर हे फुल ऑफ सरप्राईज आहे असंही म्हटलं जातं कारण इथं कधी कोण काय बोलेल किंवा कधी क्षणात नाती बदलतील याचा नेम नाही. प्रत्येक सीझनमध्ये स्पर्धकांचे कुटुंबीय बिग बॉसच्या घरात सरप्राइज भेट देतात. यावेळीसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं. 

 भांडणे, काळजी, प्रेम, घरची आठवण अशा संमिश्र भावना स्पर्धकांकडून व्यक्त होत असतानाच बिग बॅासच्या घरात यावेळी फॅमिली वीक साजरा करण्यात आला. घरापासून, आपल्या जवळच्या व्यक्तींपासून इतके दिवस दूर राहिल्यामुळे साहजिकच स्पर्धकांना त्यांच्या घराची ओढ लागू लागली आहे. म्हणूनच खास या आठवड्यात बिग बॅासच्या घरात स्पर्धकांच्या कुटंबियांनी हजेरी लावली. 

या वेळी गायत्री दातारचा भाऊ सिद्धार्थ, वहिनी हर्षदा आणि भाचा वेदांगने तिची भेट घेतली. त्यांना भेटून गायत्री खूपच भावूक झाली. भाच्याला भेटून गायत्रीला खूप आनंद झाला. या वेळी गायत्रीच्या भावाने तिच्या खेळांचे कौतुक करत तिला मोलाचा सल्लाही दिला. त्याने तिला ग्रुपमध्ये न खेळता एकटीने खेळण्यास सांगितले. स्वतःचा विचार, मत मांडून आणि त्यानुसार खेळण्यास सांगितले. या फॅमिली वीकमध्ये सर्वांचेच नातेवाईक भेटायला आल्याने भावूक झाले होते.

टॅग्स :बिग बॉस मराठीगायत्री दातार