Join us

Bigg Boss Marathi 3 Upadate: बिग बॉसने दिली गायत्रीला एक विशेष सूचना, ऐकून चेहऱ्यावरचे उडाले भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 2:15 PM

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडलेल्या “हो पाइपलाईन तुटायची नाय” या साप्ताहिक कार्यामध्ये स्नेहा कॅप्टन्सीच्या कार्यासाठीची पहिली उमेदवार ठरली.

'बिग बॉस मराठी ३' मध्ये ड्रामा, फाइट, ईगो क्लॅश कॉन्ट्रोव्हर्सी सर्वकाही आहे.बिग बॉसचे घर स्पर्धकांसाठी फुल ऑन सरप्राईज पॅकेज आहे.  घरात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. स्पर्धक स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचंड मेहनत करताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टास्कमध्ये सदस्य भान हरपून खेळतात. त्यामध्ये आपल्याला किंवा आपल्यामुळे दुसर्‍याला दुखापत तर होत नाहीना याची काळजी घ्यायचा त्यांना विसर पडतो. अनेकदा स्पर्धक टास्कदरम्यान रागाच्या भरात मर्यादा ओलांडताना दिसतात. हाणामारी पर्यंत यांची भांडणं जातात. तरी टास्क दरम्यान बिग बॉस वारंवार सूचना देत असतात एकेमकांना इजा होईल असे काही करू नका.याचा काडीमात्र फरक पडत नसल्याचे दिसते. अनेकदा नियमाचे उल्लंघन केल्यामुळे बिग बॉसला स्वतःहून पुढाकार घ्यावा लागतो.

आज बिग बॉस गायत्रीला एक विशेष सूचना देणार आहेत. बिग बॉस यांनी गायत्रीला सांगितले, आजचे कार्य पार पाडताना आपल्याला दुखापत झाली. तसेच पुढील किमान तीन आठवडे आपल्याला स्लिंग घालायचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. याचसोबत टास्क खेळण्यासाठी देखील मनाई केली आहे. आता आपल्याला त्वरित आराम मिळणे जास्त आवश्यक आहे. असे बिग बॉस यांनी गायत्रीला सांगितले. गायत्रीला आता स्वतः बिग बॉसनेच आराम करण्यासाठी सांगितल्याने आता कोणत्याही कार्यात गायत्रीला स्वतःचा परफॉर्मन्स सादर करता येणार नाही. त्यामुळे इतरांवरच रसिकांचे लक्ष खिळून राहणार हे मात्र नक्की. गायत्री नेमकं काय करते हे तर आगामी भागातच कळेल.

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडलेल्या “हो पाइपलाईन तुटायची नाय” या साप्ताहिक कार्यामध्ये स्नेहा कॅप्टन्सीच्या कार्यासाठीची पहिली उमेदवार ठरली. अजून कोणता सदस्य उमेदवार असेल ? टास्क करा पार पडला जाईल ? हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल नक्की कोणते सदस्य शिक्षेस पात्र आहेत. 

टॅग्स :गायत्री दातारबिग बॉस मराठी