Join us

Bigg Boss Marathi 3 : हो तू डेव्हिलचं आहेस...! विकासचा संयम सुटला, विशालसोबत जाम भांडला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 11:27 AM

Bigg Boss Marathi 3 च्या घरात संयमाची ऐशीतैशी! विशाल व विकास यांच्यात पुन्हा जुंपली.

ठळक मुद्देआज सगळयाचा हिशेब केला जाईल, असं विशाल म्हणाला. यामुळे विकास भडकला.

बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सीझनमध्ये ( Bigg Boss Marathi 3) कालपरवा नॉमिनेशन टास्क रंगला आणि या नॉमिनेशन टास्कच्या निमित्ताने विकास पाटील (Vikas Patil  ) व विशाल निकम ( Vishal Nikam) यांच्या मैत्रीला तडा गेला. या टास्कनंतर विशालच्या खेळीने विकास चांगलाच दुखावला होता. इतका की त्याला अश्रू अनावर झाले होते. या टास्कनंतर विकास व विशाल झालं गेलं सगळं विसरून पुन्हा एकत्र येतील, असं वाटलं होतं. पण झालं उलटलंच. नॉमिनेशन टास्कनंतर पुन्हा नवा टास्क आला आणि या टास्कदरम्यान विशाल व विकास यांच्यात पुन्हा जुंपली.काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ‘संयमाचर ऐशी तैशी’ हे साप्ताहिक कार्य रंगलं. यात एक टीम राक्षस आणि दुसरी टीम देवदूत अशी विभागणी केली गेली. कालच्या पहिल्या फेरित विकास पाटील याची टीम राक्षस बनली तर विशालची टीम देवदूत. साहजिकच राक्षस बनलेल्या टीमने देवदूतांच्या टीमच्या संयमाची जबरदस्त परीक्षा घेतली. यानंतर आजच्या एपिसोडमध्ये विशालची टीम राक्षस बनणार आहे तर विकासची टीम देवदूत. आता झालेल्या गोष्टींचा वचपा निघणारच. अशात विशालच्या टीमने विकासच्या टीमला थेट आव्हान दिले.

आज सगळयाचा हिशेब केला जाईल, असं विशाल म्हणाला. यामुळे विकास भडकला. खेळता तर येत नाही, मग हेच करणार तू, असं विकासने विशालला सुनावलं. मग काय, विशालही संतापला. मला खरोखर राक्षस बनायला नको लावूस, असं तो म्हणाला. यावर तू आहेच राक्षस आहे, असं म्हणत विकासने विशालला डिवचलं आणि विशाल आणखी बिथरला. हो मी डेव्हिल आहे, हो मी डेव्हिलचं आहे, असं तो जोरजोरात ओरडू लागला. एकंदर काय तर विशाल व विकास यांच्यातील मैत्रीला चांगलाच तडा गेला.

टॅग्स :बिग बॉस मराठी