Join us

Bigg Boss Marathi 3 : 'आपण आपापसात भांडायचं नाही' - जय, कॅप्टन्सीसाठी होतेय मजबूत प्लानिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 18:58 IST

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरात आज रंगणार आहे कॅप्टन्सी कार्य. ज्यामध्ये विशाल, सुरेखाताई आणि स्नेहा हे तीन उमेदवार असणार आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरात आज रंगणार आहे कॅप्टन्सी कार्य. ज्यामध्ये विशाल, सुरेखाताई आणि स्नेहा हे तीन उमेदवार असणार आहेत. एकीकडे मीरा, जय, गायत्री, उत्कर्ष, दादूस, सुरेखाताई आणि स्नेहा तर दुसरीकडे विशाल, विकास, आदिश, सोनाली, मीनल, तृप्तीताई आणि आविष्कार अशी टीमची विभागणी झालेली दिसणार आहे. जय आणि टीम तर दुसरीकडे, विकास आणि टीम रणनीती आखताना दिसणार आहे कसे आपल्याच टीममधील उमेदवार कॅप्टन बनतील.

जय सांगताना दिसणार आहे, “एक समर्थक आणि एक सदस्य जाणार आहे. आता सहा जणांची टीम आहे. म्हणजे सुरेखाताईसाठी  तीन आणि स्नेहासाठी तीन सदस्य. आपण एकमेकांशी नाही भांडायचे. जर तुमचे तीन – चार असतील आणि स्नेहाची नाव फाडलेली असतील तर आम्ही सगळे मिळून तुम्हाला प्रोटेक्ट करणार, पण जर स्नेहाचे तीन – चार असतील तुम्ही सगळ्यांनी तुमचे सोडा आणि स्नेहाची नावे प्रोटेक्ट करा”. 

तर दुसरीकडे, विकास सांगणार आहे, “सामान आणायला जाणार तेव्हा जय आणि उत्कर्ष तुझ्यासोबत असतील तेव्हा आपण फटाफट इकडे फाडायचे. आपण फाडायला सुरुवात करायची. कारण दोघेही आतमध्ये असणार. या टास्कमध्ये नक्की कोण जिंकणार ? कोण कॅप्टन बनणार ? हे जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठी सीझन तिसरा रात्री ९.३० वा. पहायला लागेल.

टॅग्स :बिग बॉस