बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नाती बदलताना दिसत आहेत हे मात्र नक्की! मीनल आणि विकासच्या मैत्रीमध्ये सुद्धा आता दुरावा येणार का ? असे कुठेतरी विकासच्या बोलण्यावरून वाटते आहे. घरामध्ये कोण आहे बिच्छू गॅंग ज्याबद्दल विकास सोनालीशी बोलताना दिसणार आहे ?
काल विशाल निकमला चुगली बूथद्वारे आलेल्या चुगलीमध्ये त्याच्या फॅनने सोनालीबद्दल चुगली केली, ज्याचे विशालला जरा वाईट वाटले. पण,म्हणता म्हणता सोनाली नाही तर मीनल त्या ग्रुपसोबत जाऊन गप्पा मारताना दिसणार आहे. नक्की कशाचे विकासला वाईट वाटले आहे ? मीनलने खरेच तिचा गेम सुरू केला आहे का ? नक्की काय सुरू आहे तिच्या डोक्यात हळूहळू कळेलच.
बिच्छू गँग कोण आहे?विकास सोनालीला सांगताना दिसणार आहे, हा हा हू हू चालू आहे मीनलचे... बिच्छू गॅंग बरोबर. सोनालीचे म्हणणे आहे, तिने तिचा गेम चालू केला असे असेल. तुला बोलली नाही का, सगळ्या गोष्टी. विकास पुढे म्हणाला, एन्जॉय करूया असे म्हणाली याचा अर्थ हा होतो हे मला नव्हते माहित. सोनाली त्यावर त्याला म्हणाली, तू पण जाऊन बसतोस की ? त्यावर विकास म्हणाला, असा ? इतका वेळ?... आणि मी बसत नाही, लोक माझ्याकडे येतात. हा फरक आहे.... कळले. नेमकी बिच्छू गँग कोण आहे, हे आजच्या भागात कळेल.