Join us

Bigg Boss Marathi 3 : महेश मांजरेकर गायत्रीला ‘माचीस’ का म्हणाले?  ‘चावडी’वर पुन्हा मीराला खडसावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 12:05 PM

Bigg Boss Marathi 3 Chavadi special: काल बिग बॉस मराठीची चावडी रंगली आणि पुन्हा एकदा महेश मांजरेकरांनी गायत्री दातार व मीरा जगन्नाथ यांची शाळा घेतली.

बिग बॉस मराठी’चं तिसरं पर्व (Bigg Boss Marathi 3) चांगलंच गाजतंय. काल बिग बॉस मराठीची चावडी रंगली आणि पुन्हा एकदा महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar ) गायत्री दातार ( Gayatri Datar ) व मीरा जगन्नाथ (Mira Jagganath) यांची शाळा घेतली. मांजरेकरांनी चक्क गायत्रीला ‘माचीस’ची उपमा दिली.या आठवड्यात माचीस गायत्री होती, असं महेश मांजरेकर म्हणाले. आता का? तर एका टास्कदरम्यान गायत्रीने मीराकडे उत्कर्षची चुगली केल्याबद्दल. उत्कर्ष मीनलला खांब घ्यायला सांगितला, असं गायत्री म्हणाली आणि मग मीरा भडकली. नेमक्या याच कारणावरून मांजरेकरांनी मीरा व गायत्रीचा क्लास घेतला. तुझं काय सगळंच ऐकायचं का गं? यावर मीरानेही स्पष्टीकरण दिलं. तु असं केलंस का? असं मी उत्कर्षला विचारलं होतं, पण हो की नाही उत्तर देण्याऐवजी त्याने थेट मीनला बोलवलं. यानंतर मी काहीच नाही बोलले, तो किती भडकला होता, असं मीरा म्हणाली. यावर महेश मांजरेकर पुन्हा संतापले. मी उत्कर्षच्या जागी असतो तर तोंड पण पाहिलं नसतं. पण तुमचं तेच ना. तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना, अशा शब्दांत त्यांनी मीराचे कान टोचले.

चाहते म्हणाले, आम्हाला आधीच माहित होतं...कलर्स मराठीने चावडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर चाहत्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. आम्हाला आधीपासूनच माहित आहे ती माचीस आहे ती, असं एका चाहत्याने लिहिलं. मीराचं तोंड बघून असं वाटतंय, लयचं झापलंय, अशी कमेंट एका चाहत्याने केली. मीरा असो की गायत्री दम नाही दोघीत पण स्वतंत्र खेळायचा. एकमेकीच्या जीवावर खेळतात, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली.

टॅग्स :बिग बॉस मराठी