बिग बॉस मारठी (Bigg Boss Marathi 3)च्या घरात आता टॉप सात सदस्य उरले आहेत.आज घरामध्ये पार पडणार आहे एक महत्वपूर्ण टास्क ज्यामध्ये सदस्यांमध्ये जोरदार भांडण होताना बघायला मिळणार आहे. आणि या वादाचे, भांडणाचे कारण आहे धनराशी. बिग बॉस यांनी नुकत्याच प्रोमो मध्ये जाहीर केले, पंचवीस लाखाच्या धनराशीचे विभाजन करायचे आहे. विकास त्यावर म्हणाला मी साडेबारा लाख डिझर्व करतो. मीरा म्हणाली मला कोणालाच द्यायचं नाहीये. विशाल तवर चिडून म्हणताना दिसणार आहे पोरखेळ नाहीये हा... बिग बॉस यांनी जाहीर केले, दंड स्वरूप सिझन तीनच्या विजेत्याला मिळणारी धनराशी होईल शून्य !
आता घरामध्ये सात सदस्य उरले असून सगळ्याच सदस्यांची नजर बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर आहे. हे सातही सदस्य आता शेवटच्या फेरीत पोहचण्यासाठी सज्ज आहेत. या सात जणांमध्ये रंगणार आहे “Ticket To Finale” जिंकण्याचा टास्क. मीरा, जय, सोनाली, विशाल, विकास आणि उत्कर्ष यामध्ये बघूया कोणाला मिळणार टिकिट आणि कोणता सदस्य जाणार थेट finale मध्ये.