Join us

Bigg boss फेम अमृता धोंगडेच्या घरी वाजणार सनईचौघडे?; मेहंदीचा व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 17:30 IST

Amruta Dhongade: अमृताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच चर्चेत येणारा शो म्हणजे बिग बॉस मराठी (bigg boss marathi) . आतापर्यंत या शोचे चार पर्व पार पडले आहेत. यात चौथ्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री अमृता धोंगडे (Amruta Dhongade) सध्या चर्चेत आली आहे. अमृताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या अमृताला बिग बॉसमुळे खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या शो मुळे अमृता प्रकाशझोतात आली. त्यामुळे सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाल्याचं दिसून येतं. अमृताही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यामुळेच ती बऱ्याचदा तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफमधील गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करते. यात अलिकडेच तिने मेहंदीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने हातावर आणि पायावर छान ब्राईडल मेहंदी काढली आहे. त्यामुळे अमृता लग्न करतीये की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. मात्र, या प्रकरणी अमृताने कोणतंही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे अमृता खरंच लग्न करणार आहे की नाही हे मात्र गुलदस्त्यात आहे. 

टॅग्स :अमृता धोंगडेबिग बॉस मराठीटेलिव्हिजनसेलिब्रिटी