Join us

Bigg Boss Marathi 4 : समृद्धीने केलं अक्षय,अपूर्वाला बाद, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 14:53 IST

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज अक्षय, अपूर्वा, समृद्धीला जाब विचारताना दिसणार आहेत.

बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरामध्ये आज अक्षय, अपूर्वा, समृद्धीला जाब विचारताना दिसणार आहेत. समृद्धीने अक्षय आणि अपूर्वाला बाद केले वा त्यांना ते दिसलेच नाही असं का? असे अपूर्वाचे म्हणणे आहे. ज्यावर समृद्धी तिची बाजू मांडताना दिसणार आहे.

अपूर्वाचे म्हणणे आहे, तुम्हां तिघांनाही अक्षय - अपूर्वा नाही वाटलं का? त्यावर समृद्धीचे म्हणणे आहे, सगळ्यात पहिली तुमची नाव आली काय बोलते आहेस तू ? जर मी एकटीचं करत बसली असती नाही अपूर्वाचं नाही अक्षयचं ना तर हा पण गेम हातातून गेला असता... अक्षयचे म्हणणे आहे, जेव्हा मी आणि माने राहिलो होतो तेव्हा रोहित आणि रुचिराला ते कॅपेबल वाटले माझ्यापेक्षा. तुझ्यावेळी यशश्री राहिली होती, यशश्रीपेक्षा अपूर्वा कॅपेबल नाहीये... त्यावर समृद्धीने विचारले, ते बोले का असे? 

अपूर्वा म्हणाली, बोलायचं काय त्यात ? अक्षय म्हणाला, तू मला सांग मी माने यांचे घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचार करायला किती वेळ होता कि अक्षयला जाऊ द्यायचे... गेम तिकडेच पलटू शकला असता ? खेळाचा समाज, आता केलेली कॅप्टीन्सी गेम पलटला नसता का ... ते कोणाला पकडायला आले ? मला पकडायला आले... आणि तिथे वेळ होता... अपूर्वाचे म्हणणे आहे, तू संचालक म्हणून बघत होतीस कि? आता नक्की समृद्धीचे काही चुकले का? ती फेअर कि नाही ? हे आज कळेलच. 

टॅग्स :बिग बॉस मराठी