'बिग बॉस मराठी' (Big Boss Marathi) सध्या रंजक वळणावर आहे. स्पर्धेतील रंजकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ‘बिग बॉस मराठी ४' ता कोण होणार, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. घरातील ७७ दिवस पार पडले आहेत त्यामुळे आता विजेता कोण होणार, हे जाणून घेण्यासाठी केवळ २ आठवड्यांचा कालावधी उरला आहे. मात्र त्याआधी बिग बॉसने सदस्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
बिग बॉस मराठी ४ सीझनच्या विजेत्याला मिळणारी रक्कम ठरवण्यासाठी बिग बॉसनं कॅप्टन्सी टास्क ठरवलं होतं. बिग बॉस मराठीच्या विजेत्याला आधी २५ लाखांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळणार होती. पण कॅप्टन्सी कार्यादरम्यान यातील जवळजवळ अर्धी रक्कम कमी झाली. कॅप्टन की बक्षिसाची रक्कम यातील एक पर्याय सदस्यांना निवडायचा होता. सदस्यांनी बझर वाजवून कॅप्टनी कार्यातून बाद होत बक्षिसाची रक्कम कायम ठेवायची होती.
सदर कॅप्टन्सी कार्यामध्ये प्रत्येक सदस्याच्या नावाची पाटी त्याच्या गळ्यात अडकवण्यात आली होती. दर दहा सेकंदाला बक्षिसाच्या रकमेतून ५० हजार कमी होणार होते. कॅप्टन की बक्षिसाची रक्कम यातील एक पर्याय सदस्यांना निवडायचा होता. सदस्यांनी बझर वाजवून कॅप्टनी कार्यातून बाद होत बक्षिसाची रक्कम कायम ठेवायची होती. टास्क सुरू झाल्यानंतर 20 सेकंदांनी 24 लाख रक्कम वाचवत अक्षय केळकरने कॅप्टन्सी कार्यातून माघार घेत त्याच्या नावाची पाटी एटीएम मशिनमध्ये टाकली. त्यानंतर पुढच्या 10 सेकंदात किरण माने व अपूर्वा नेमळेकर कॅप्टन्सी कार्यातून बाहेर पडले.
आरोह वेलणकर व प्रसाद जवादे यांच्यात टास्कमध्ये माघार घेण्यावर वाद झाले. बक्षिसाची रक्कम आठ लाखावर आल्यानंतर प्रसाद कॅप्टन्सी कार्यातून बाहेर पडला. त्यानंतर १० सेकंदात अमृता धोंगडेनेही तिच्या नावाची पाटी एटीएम मशीनमध्ये टाकली. कॅप्टन्सी कार्यात आरोह वेलणकर विजयी ठरल्यामुळे तो घरातील शेवटचा कॅप्टन ठरला आहे. परंतु, आता ‘बिग बॉस’च्या चौथ्या सीझनच्या विजेत्याला ट्रॉफी व केवळ आठ लाख रुपये मिळणार आहेत.
दरम्यान, बिग बॉस मराठी ४ चा ग्रँड फिनाले ८ जानेवारी २०२३ला संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. कलर्स मराठी वाहिनीनं अजून अधिकृत घोषणा केलेली नाही. प्रसाद जवादे आणि अमृता धोंगडे हे ‘बिग बॉस मराठी ४’च्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र मायबाप प्रेक्षक कोणाला आपला कौल देतात, ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"