Join us

Bigg Boss Marathi 4, Day 10 : घरामध्ये गटबाजी?, किरण माने म्हणताहेत - याला ग्रुपमध्ये घेणं म्हणजे…

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 12:28 PM

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांचे गट बनणं अगदीच साहजिक आहे, पण किती टिकतील हे मात्र वेळच ठरवते.

बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरामध्ये सदस्यांचे गट बनणे हे अगदीच साहजिक आहे पण किती टिकतील हे मात्र वेळच ठरवते. असाच एक गट आता घरामध्ये बनेल का अशी शंका आपल्या सगळयांच्या मनामध्ये येऊ लागली आहे. किरण माने, अमृता धोंगडे, अमृता देशमुख, तेजस्विनी, योगेश, विकास आणि निखिल यांच्यामध्ये आज चर्चा रंगणार आहे. 

बिग बॉस मराठी ४च्या घरामधील काही सदस्यांमध्ये चर्चा रंगताना दिसत आहे, ज्यातून घरात ग्रुप बनल्याचे वाटत आहे. ज्यामध्ये अमृता धोंगडे म्हणाली, "ए टीम म्हणून माझं म्हणणं आहे आपण टीम खेळलो, तो आपल्या टीमचा माणूस होता त्याला विचारलं तो नाही आला संपला विषय.. किरण माने यांचं म्हणणं आहे, "त्याला कळलं आपण उघडे पडणार म्हणून तो पळतो आहे”. काल पहिली फेरी झाल्या झाल्या मी याला (विकासला ) म्हणालो, याचा गेम सुरु झाला, याला ग्रुपमध्ये घेणं म्हणजे… बावळटपणा काही अर्थच नाही तो कोणाचं ऐकूनच घेत नाही. 

निखिल राजेशिर्के म्हणाला, आता अजून एक विचारायचं आहे, यापुढे कुठले टीम टास्क आले तर आपण एकत्र टीम म्हणून खेळायचं का? सगळयांची सहमती आली. किरण यांचं म्हणणं आहे तेजस्विनीला, “तू मला झिरो ठरवून देखील मी तुला सेफ केलं नॉमिनेशनमध्ये, माझ्या मनात राग नाही” आणि “अमृता मी माझी कॅप्टन्सी तुला “वाचवण्यात घालवली, तो निर्णय वेगळा होता, त्यावेळेस मी तुम्हांला सिग्नल देतं होतो पण तुम्ही ऐकत नव्हता”... आता बघूया पुढे अजून काय चर्चा झाली.  

टॅग्स :बिग बॉस मराठीकिरण माने