बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरामध्ये सदस्यांना काही दिवसांनंतर घरच्या सदस्यांची आठवण येणे साहजिकच आहे. कधी कधी त्यांना एकटे देखील वाटू शकते. अमृता(Amruta Dhongade)ला देखील अश्रू अनावर झाले आणि तिला रडू कोसळले. आणि म्हणूनच किरण माने (Kiran Mane) तिची समजूत काढताना दिसले तर प्रसाद तिला हसवण्याचा प्रयत्न करताना दिसला.
प्रसादने अमृताला विचारले, "आम्ही काय घरातले नाही का ? का रडतेस? नाही म्हणजे जस्ट विचारतो आहे. नसू शकतो कदाचित. अमृताचे म्हणणे आहे इथे सगळेच खेळायला आले आहेत. किरण माने म्हणाले, मी काय काय सोसलं असेल काल ... प्रसाद म्हणाला, टास्क हा पण आहे ना की, तुला खरंच ओळखायचे आहे कोण आपले आहेत ? कोण? ते चुकलं ना की ही आठवण जोरात येते. पहिल्या दिवशी माझ्या डोक्यात फक्त तेच सुरु होतं.
किरण म्हणाले, ते चुकलं ना की गणित चुकतं. काही लोकं आपल्या जवळ येतात ना ते आपला प्रभाव कमी करायला येतात. आणि काही लोकं आपला प्रभाव वाढवायला येतात. काही माणसांनी याला (विकासाला) विकून खाल्लं असतं कि नाही, एकटा असता तर ? निगेटिव्ह असो वा पॉसिटीव्ह आला तो फोकसमध्ये काल. त्यांना हे कळत नाही आपला माणूसच आपल्याला झाकतो आहे. विकास आणि मी जे जगतो आहे ते खरं जगतो आहे... प्रभाव वाढतो आहे." बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर पाहायला मिळेल.