बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 4) शो म्हटलं की टास्क, वाद, भांडण आणि राडे आलेच. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात होऊन १० दिवस उलटले असून आता हळूहळू कलाकारांचे खरे चेहरे लोकांसमोर येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अपूर्वा, रुचिरा आणि समृद्धीमध्ये रंगणार आहे चर्चा. ज्यामध्ये अपूर्वा रुचिरासमोर आपला मुद्दा मांडताना दिसणार आहे.
अपूर्वा रुचिराला सांगताना दिसणार आहे, "त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी तुला सांगते की आपलं हे ठरलं होतं कोणी जिंकू दे अक्षय किंवा रोहित आपणं दोघांच्या आनंदात क्लिअर आहोत... मला काळजी तुझी वाटतं होती कारण तू नॉमिनेटेड आहेस. आणि ही तुझी सिद्ध करण्याची संधी होती, हे देखील मी तुला पोट तिडकीने सांगत होते. आता हे सगळं करत असताना, जर आज मी रोहितच्या बाजूने खेळते आहे तर मी अक्षयच्या बाजूने नाही बोलणार मी अशी मुलगी आहे...
ती पुढे म्हणाली, "मी कट्टर आहे" आणि याच मुद्द्यावरून माझं आणि समृद्धीचं वाजलं होतं. कारणं मला तेजस्विनीने जिंकावं (पहिले कॅप्टन्सी कार्य) असं वाटतं होतं, आणि जे चुगलीमध्ये आलं देखील. मी तेजूच्या बाजूने खेळतं होते आणि म्हणून समृद्धी भडकली होती. मी नाही biased खेळू शकतं. मी जर एका व्यक्तीला पाठिंबा देत असेन तर मी त्याच्याच नावाने बोलबाला करेन". आता या सगळ्यावर रुचिरा आणि समृद्धीचे काय म्हणणे आहे हे आजच्या भागामध्ये कळेल.