Join us

Bigg Boss Marathi 4, Day 15 : समृद्धीचा यशश्रीला मोलाचा सल्ला !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 10:32 AM

Bigg Boss Marathi 4 : समृद्धीने दिलेला सल्ला यशश्रीला पटेल का, हे आजच्या भागात कळेल.

बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरात सदस्यांना बऱ्याचदा आपण कुठे चुकत आहोत,आपण रागाच्या भरात काय बोलून गेलो हे कळत नाही आणि त्यामुळे सदस्यांना व्यक्तीबद्दल गैरसमज होऊ शकतात. आणि याचविषयी आज समृद्धी यशश्रीसोबत फ्रेंड टू फ्रेंड चर्चा करताना दिसणार आहे. 

समृद्धी यशश्रीला सांगताना दिसणार आहे, "एक गोष्ट मला सांगायची आहे.कौतुक करते मी. हे सगळे तुझ्याविरुद्ध असले तरीदेखील. पण काय होणार, या गोष्टीमुळे तू खूप आवेगपूर्ण दिसतेस. पुढे जेव्हा तुला स्ट्रॉंग सपोर्ट लागेल ना तेव्हा लोकं दोन तीन वेळा विचार करतील. मला माहिती आहे तुला असं वाटतं कि,कोणी तुझं ऐकत नाहीये वगैरे, पण मी तुला ग्राह्य धरते. पण त्याचवेळेला दुसरी बाजू इतकी स्ट्रॉंग होऊन जाते कि तुझ्या प्रेरणेमुळे…" रोहितचं पण म्हणणं पडलं "तू टार्गेट होते आहेस प्रामुख्याने" त्यावर यशश्री तिची बाजू मांडताना दिसणार आहे, "समृद्धी ज्यांना माझ्याविषयी विश्वास वाटायला पाहिजे त्यांना मी दाखवून दिले आहे."

अजून ही चर्चा किती पुढे गेली ? समृद्धीने दिलेला सल्ला यशश्रीला पटला का? हे  जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस  मराठी सोम ते शुक्र रात्री १० वाजता आणि शनि - रवि रात्री ९.३० वाजता या चर्चेनंतर आता हे कोणाला नॉमिनेट करणार हे आजच्या भागामध्ये कळेल.

टॅग्स :बिग बॉस मराठी