कोर्टाची पायरी चढू नये पण बिग बॉस(Bigg boss Marathi 4)च्या घरात कोर्टाची पायरी चढल्याशिवाय शहाणपण येत नाही. बिग बॉसचे हे घर म्हणजे आरोप - प्रत्यारोप यांची शर्यत आहे, पण असे असून देखील काही सदस्य आपली स्पष्ट आणि रोख ठोक मतं मांडत नाहीत, आपली ठाम भूमिका मांडताना दिसत नाहीत. पण घराचा कॅप्टन होण्यासाठी काही गुणांची आवश्यकता असते. उत्तम निर्णय क्षमता, ठाम मतं असणे, स्वतः च्या मतावर ठाम उभे राहणे , चर्चेत राहणे आणि घरावर वर्चस्व असणे महत्वाचे आहे. आणि म्हणूनच बिग बॉस यांनी सदस्यांवर काल सोपवले रोख ठोक हे कार्य सोपवले. अमृता धोंगडे, अपूर्वा यांच्यामध्ये आज शाब्दिक युद्ध पेटणार आहे.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सुरु असलेल्या रोख ठोक या कार्यात उमेदवार आणि बाकीचे साक्षीदार बनलेले सदस्य आपल्या मनातील सर्व गोष्टी ठामपणे आणि न घाबरता बोलून दाखवत आहेत कारण हा टास्कच मुळात त्यासाठी आहे. किरण माने यांनी तेजस्विनीला मारलेला टोमणा असो वा तेजस्विनीने समृद्धीला मारलेला टोमणा असो सगळेच सदस्य आपली बाजू मांडताना दिसत आहेत.
कॅप्टन्सीचे उमेदवार अपूर्वा आणि अमृता देखील आपली बाजू मांडताना दिसणार आहेत. ज्यामध्ये अमृता देखील भर कोर्टात अपूर्वाला खडे बोल सुनावणार आहे. अपूर्वाचे म्हणणे आहे, अपूर्वा जर आवाज चढवते तर दुसऱ्यांचे नीट ऐकते पण. अमृताचे म्हणणे आहे जी मुलगी एखाद्या सदस्याची लायकी काढते तर हिला मी कॅप्टन म्हणून का घेऊ ? अपूर्वा त्यावर म्हणाली, ह्याच्यावर दुनिया हसेल मला हे मान्य नाही. अमृता म्हणाली, मला हि योग्य वाटतंच नाही. हो तुझी लायकी काढणार... बघूया हा वाद अजून किती वाढला...