बिग बॉस मराठीचं चौथं पर्व आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या पर्वाचा महाअंतिम सोहळा सध्या सुरू असून या सोहळ्यात कोण विजेता ठरणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. या महाअंतिम सोहळ्याला सुरूवातीपासून सहभागी झालेले १६ सदस्य आणि आधीच्या सीझनमधील काही स्पर्धकही पाहायला मिळाले. मात्र यात या सीझनमध्ये रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे हे कपल गैरहजर आहे. रियुनियनमध्ये हे कपल पाहायला मिळाले होते. दरम्यान एकीकडे बिग बॉस मराठी ४चा ग्रॅण्ड फिनाले रंगलेला असताना दुसरीकडे रुचिरा गैरहजर राहिली असली तरी सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
रुचिरा जाधव हिने डायरीत लिहिलेल्या गोष्टीचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, प्रत्येक क्षणी जेव्हा मला असे वाटले की, हा शेवट होईल, #ruchirasay मी ठरवले की "हा इंटरव्हल पॉइंट आहे" ! प्रेम, विश्वास आणि शांती. आयुष्य अनमोल आहे… तुम्हीही आहात!!रुचिराने शेअर केलेल्या डायरीच्या फोटोत तिने लिहिले की, एण्ड ऑफ द चाप्टर...एण्ड ऑफ द जर्नी... यात तिने आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल लिहिले आहे. यात तिने २०२१ मध्ये बिग बॉससाठी विचारले होते पण बहिणीच्या लग्नामुळे मला जमले नसल्याचे सांगितले. मात्र चौथ्या सीझनमध्ये एका ट्विस्टसहित विचारण्यात आले जो फक्त याच सीझनाच नाही तर आतापर्यंतच्या सगळ्याच सीझनचा मोठा ट्विस्ट असणार होता. मी आनंदी होते, थोडे दडपण होते. पण विश्वासही होता. कारण पर्सनल लाईफ नॅशनल टेलिव्हिजनवर एक्झपोझ करणं माझ्यासाठी चॅलेजिंग होत असं रुचिरानं म्हटलं.
रुचिराची ही पोस्ट आणि महाअंतिम सोहळ्यातील गैरहजरी तिच्यात आणि रोहित शिंदे यांच्या नात्यातील कडवटपणा अद्याप संपलेला नसल्याचे सांगते. त्यामुळे त्यांचे हे नाते टिकेल का, हे आगामी भागातच कळेल.