Join us

Bigg Boss Marathi 4 : अन् फायटर योगेश जाधवला बिग बॉसच्या घरात झाले अश्रू अनावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 3:53 PM

बिग बॉस मराठीच्या आजवरच्या सीझनमधील सर्वात उंच स्पर्धक म्हणून योगेश जाधव ओळखला जाणार आहे. योगेश जावध मूळचा अकलूजचा असून तो एक प्रोफेशनल फायटर आहे.

'बिग बॉस' मराठीत यंदा एकामागोमाग एक धक्के दिले जात आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींची बांधणी करत यंदाचं सीझन हटके करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बिग बॉस मराठीच्या सिझन चौथामध्ये  बिग बॉस मराठीच्या सिझन चौथामध्ये तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे, निखिल राजशिर्के, किरण माने, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, योगेश जाधव, यशश्री मसुरकर, अमृता देशमुख, विकास सावंत, मेघा घाडगे, त्रिशूल मराठे, रुचिरा जाधव, रोहित शिंदे यांनी घरात एंट्री घेतली आहे. १०० दिवस आपल्या माणसांशिवाय, कुठल्याही करमणूकीच्या साधनांशिवाय राहायचे म्हणजे सोपं नाहीये. या घरात क्षणोक्षणी आपल्या जवळच्या व्यक्तीची आठवण येणे सहाजिकच आहे. आज किरण माने, योगेश जाधव आणि विकास सावंत या तिघांमध्ये चर्चा रंगताना दिसणार आहे. त्या चर्चे दरम्यान विकास असं काही सांगून गेला ज्यामुळे योगेशला अश्रू अनावर झाले. 

योगेश किरण माने आणि विकासला सांगताना दिसला, "आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत... आपण स्पेशल आहे, महादेवाने आपल्याला हि ऍबिलिटी दिली आहे याचा फायदा आपण करून घ्यायचा. विकास पुढे म्हणाला, बिग बॉसमध्ये आपण आलो म्हणजे आपण खास आहोत. किरण माने त्यावर म्हणाले,"काही जणांना त्यांचा संघर्ष बघून बोलावलं आहे. विकास म्हणाला काल सामान भरताना मला माझी आई आठवली, हे ऐकून योगेशला त्याचा आईची आठवण आली आणि त्याला रडू कोसळले. या घरात प्रत्येकाला आपल्या माणसाची आठवण येते. पण, घरातले सदस्यचं एकमेकांचा आधार बनतात, त्यांचे मनोबळ वाढवतात, त्यांना धीर देतात. 

बघूया घरामध्ये आज अजून काय काय घडले. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

टॅग्स :बिग बॉस