Join us

Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी-४' ला होस्ट मिळाला; सीझन नवा, खेळाडू नवे अन्...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 8:45 PM

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या शोचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आणि चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली. पण या सीझनचं सुत्रसंचालन कोण करणार? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनसाठीचा होस्ट निश्चित झाला आहे. बिग बॉसचं नवं सीझन, नवे खेळाडू दिसणार असले तरी होस्ट मात्र तोच असणार आहे. म्हणजेच अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हेच बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्येही होस्ट असणार आहेत. 

बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये महेश मांजरेकर दिसणार नाहीत अशी चर्चा रंगली होती. याच बातमीचा धागा पकडून आज कलर्सकडून नव्या सीझनसाठी होस्ट बदलण्यात आलेला नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याची घोषणा करण्यात आली असून महेश मांजरेकर यात दिसून येत आहेत.

"वर्गात विद्यार्थी नवे असतात, पण मास्तर तोच. महेश वामन मांजरेकर. यावेळी जरा वेगळी शाळा घेऊयात", असं महेश मांजरेकर बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनच्या टीझरमध्ये बोलताना दिसतात. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धकांची 'शाळा' घेताना काय नवं पाहायला मिळणार आहे याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीमहेश मांजरेकर