Join us  

Bigg Boss Marathi 4 : ठरलं तर..! 'बिग बॉस मराठी ४' येणार या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 7:32 PM

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठी ४चा नवा प्रोमो समोर आला आहे, ज्यात या रिएलिटी शोच्या ग्रॅण्ड प्रीमियरची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वा(Bigg Boss Marathi 4)ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती. त्यात यंदाच्या सीझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) करणार आहेत, यावरदेखील शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर हा शो कधी भेटीला येणार आणि यात कोणकोणते स्पर्धक पाहायला मिळणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. दरम्यान आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कलर्स मराठी वाहिनीने नुकताच त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर बिग बॉस मराठी ४चा नवा प्रोमो शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, कधी एकमेकांना साथ देतात तर कधी होतात टास्क मध्ये फेल, पण BIGG BOSS मराठीच्या घरात सगळं होणार, यंदा ऑल इज वेल... बिग बॉस मराठीचा ग्रॅण्ड प्रीमियर २ ऑक्टोबरला संध्या ७.३० वा, सोम - शुक्र रात्री १० वा, शनि- रवि रात्री ९.३० वा फक्त कलर्स मराठीवर!

या व्हिडीओत या शोचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर पाहायला मिळत आहेत. यात ते म्हणत आहेत की होस्ट जरी करत असलो तरी अनेक भूमिका कराव्या लागतात. मग कधी पोस्टमन बनून मायबाप प्रेक्षकांच्या सूचना स्पर्धकांपर्यंत पोहचाव्या लागतात. तर कधी खेळातील गुंता सोडवणारा तटस्थ अंपायर. जग खोटं बोलत असेल पण कॅमेरा कधी खोटं बोलत नाही. त्यामुळे आता होणार दुध का दुध आणि ताकाचं ताक. तर कधी शाळेतला कडक मास्तर. त्यानंतर महेश मांजरेकर सांगताना दिसत आहेत की, कुटुंब प्रमुख म्हटल्यानंतर घरातील शिस्त, शांतता जपावीच लागणार, तेव्हाच घराचं घरपण टिकतं. बिग बॉस मराठी यंदा ऑल इज वेल. अशाप्रकारे प्रेक्षकांची शोच्या तारखेची प्रतीक्षा संपली असेल तरी कोणकोणते स्पर्धक बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार, हे पाहणे औत्सुकतेचं ठरणार आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीमहेश मांजरेकर