Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात यंदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळला आहे. शनिवारी आणि रविवारी 'बिग बॉस'ची चावडी रंगली. घरातून या आठवड्यात दोन स्पर्धक बाहेर गेले. शनिवारी यशश्री मसुरकर एलिमनेट झाली. तर रविवारी महेश मांजेकर यांनी थेट 'बिग बॉस'च्या घरात जाऊन आणखी एका स्पर्धकाला घराबाहेर आणलं. तो स्पर्धक म्हणजे किरण माने. (Kiran Mane)
'बिग बॉस'नं यावेळी स्पर्धकांना धक्का देत एकाच आठवड्यात दोन स्पर्धकांना घराबाहेर केलं आहे. पण यातही मोठा ट्विस्ट आणला आहे. रविवारी किरण माने 'बिग बॉस'च्या घराच्या मुख्य दरवाजातून घराबाहेर जाताना दिसले असले तरी ते स्पर्धेतून बाद झालेले नाहीत. तशी माहिती महेश मांजरेकर यांनी कालच्या एपिसोडच्या अखेरीस दिली. पण किरण माने अजूनही स्पर्धेत कायम आहेत याची कल्पना घरातील सदस्यांना नाही. त्यामुळे येत्या आठवड्यात आणखी रोमांचक गोष्टी घरात पाहायला मिळणार आहेत.
किरण मानेंना मिळाली स्पेशल पावर'बिग बॉस'च्या घरातून किरण माने बाहेर पडले असले तरी ते स्पर्धेतून बाहेर गेलेले नाहीत. 'बिग बॉस'नं किरण माने यांना 'सीक्रेट रुम'मध्ये ठेवलं आहे. 'बिग बॉस'च्या मुख्य घराच्या बाजूलाच ही सीक्रेट रुम आहे. आता पुढचा आठवडा किरण माने याच सीक्रेट रुममध्ये बसून घरातील सदस्यांवर लक्ष ठेवणार आहेत. घरातील सदस्य कुणाच्या पाठीमागून कुणाशी काय बोलतात, कोण खरं आणि कोण खोटं हे सारंकाही आता किरण माने यांना पाहता येणार आहे.