Join us

Bigg Boss Marathi 4 : सदस्यांमध्ये सुरु आहे डील ! तेजस्विनी अक्षय आणि अपूर्वाशी हातमिळवणी करेल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 20:11 IST

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात अपूर्वा, अक्षय तेजस्विनीमध्ये सुरु आहे डील ? कॅप्टन्सी कार्यात विजयी होण्यासाठी सदस्य एकमेकांसोबत डील करताना दिसत आहेत.

बिग बॉसच्या घरात अपूर्वा, अक्षय तेजस्विनीमध्ये सुरु आहे डील ? कॅप्टन्सी कार्यात विजयी होण्यासाठी सदस्य एकमेकांसोबत डील करताना दिसत आहेत. अक्षय तेजस्विनीला देखील डील देताना दिसणार आहे. 

अपूर्वाचे म्हणणे आहे, सध्या तरी एकच पर्याय आहे माझ्या बॅगला हात लावला तर मी दोघांची बॅग उद्धवस्त करेन... हा माझा पहिला प्लॅन आहे. मला आवडेल जर तू माझ्या बरोबर आलीस आणि त्याची बॅग उद्धवस्त केलीस... लागलीच अक्षयने तेजस्विनीला दुसरी डील दिली उद्या मी तुझ्या बाजूने खेळेन. तेजस्विनी म्हणाली, मला ते पाहिजे. दुसरीकडे, रोहित, अमृता धोंगडे, समृद्धी बोलताना दिसणार आहे. रोहितचे म्हणणे आहे, ते आता काय डील घेणार माहिती आहे का आपण दोघे रोहितला काढूया ही डील असणार आहे.  मी उचलून उचलून फेकणार आहे फक्त हात लावू दे. 

तेजस्विनी अपूर्वाला सांगणार आहे, जर आपण एकमेकींचे नष्ट नाही केले तर? कोणी पण ऐकू देत पण आपण हि डील केली तर... अपूर्वाचे म्हणणे आहे त्याने काय होणार आहे? असं असेल तर तो दोनशे टक्के माझी तो नष्ट करणार. अक्षय म्हणाला, तेजा खात्री दिली तरचं मी उद्या खेळणार हा. जसा मी तुला शब्द देतो तिसऱ्या राऊंड पर्यंत मी खेळणार तू मला बोलायला पण येऊ नकोस. जर मी शब्द दिला तर मग तसा खेळ पण दिसला पाहिजे.  आता तेजस्विनी नक्की काय करणार ? अक्षय आणि अपूर्वाशी हातमिळवणी करेल ? कि ती तिचा खेळ खेळेल ? कळेल आजच्या भागामध्ये. पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.
टॅग्स :बिग बॉस मराठीअपूर्वा नेमळेकर