Join us  

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरातील या व्यक्तीचं आहे अपूर्वावर क्रश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 5:27 PM

आज या सदस्यांचा घरातील सातवा दिवस आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भांडणासोबतच आज जरा मजामस्ती देखील बघायला मिळणार आहे.

Bigg boss marathi 4: बिग बॉस मराठीचे आतापर्यंत तीन सीझन झाले आहेत. मेघा धाडे पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती. तर दुसऱ्या सीझनमध्ये शिव ठाकरेनं बाजी मारली होती. तिसऱ्या सीझनमध्ये विशाल निकमनं ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. आता बिग बॉस मराठीचे चौथा सीझन 2 ऑक्टोबर रोजी सुरू झाला आहे. 16 स्पर्धकांनी घरात प्रवेश केला आहे. 

आज या सदस्यांचा घरातील सातवा दिवस आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भांडणासोबतच आज जरा मजामस्ती देखील बघायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज योगेश असणार आहे जेलमध्ये. त्यासाठी अपूर्वा हात जोडून मेघा घाडगे समोर विनवणी करताना दिसणार आहे कि त्याच्याकडून नकळत घडले आहे. तुम्ही असं निर्दयी होऊ नका. योगेशराव तुम्ही गप बसा कि तुमच्यासाठी बोलते आहे कि मी. मेघाने विचारले तुम्ही कोण त्यांच्या ? त्यावर योगेश म्हणाला, माझ्या क्रश ... ! मेघा ताई म्हणाली, "परत इंग्रजी शब्द वापरला, आता तुम्हीचं बोला.. अपूर्वा म्हणाली, मी पुन्हा एकदा योगेश रावांसाठी विनवणी करते. आता जर तू बोलास पुन्हा तर खवटा घालेन गप बस...”

मेघा घाडगे अपूर्वाच्या विनवणीचा मान राखून योगेशला जेलच्या बाहेर काढतील ? कि त्याची शिक्षा अजून वाढेल बघूया आजच्या भागामध्ये.

टॅग्स :बिग बॉस मराठीअपूर्वा नेमळेकरटिव्ही कलाकार