बिग बॉस मराठीच्या घरामधून काल रुचिरा जाधवला बाहेर पडावे लागले. आज यशश्री, रोहित आणि समृद्धी चर्चा करताना दिसणार आहे. ज्यामध्ये यशश्री रुचिराबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. आणि काही सदस्यांबद्दल समृद्धी आणि यशश्री आपले मत मांडताना दिसणार आहेत.
यशश्रीचे म्हणणे आहे, "खूप मोठ्याने बोलणारे, आपले म्हणणं मांडणारे आणि पटवून देणारी लोकं आहेत. काहीहि झालं तरी आपलं ते खरं करणारे. त्यांच्या तुलनेत मला रुचिरा अशी वाटते कि, जरी तिला कळतं असलं काय चाललं आहे काय नाही तरी ना तिला लोकांची मनं दुखवायला आवडतं नाही. समृद्धीचे म्हणणे आहे, हेच कारण आहे मी आणि यश माझ्या नॉमिनेशननंतर जे बोलायला आलो होतो जे आपण ठरवलं होतं third perceptive develop करण्याचा… कि मला पण कुठे ना कुठे असंच वाटतं होतं कि, हे तर मत माझंच होत पण. फक्त ते बोले म्हणून ते त्यांचे मत म्हणून बाहेर जात आहे. वेळ आल्यावर आपणं ती गोष्ट केली असती ना तर आज हि वेळ नसती आली. यशश्रीचे म्हणणे आहे, काय असतं ना रोहित आपला आवाज असला, आपलं मत असलं तरीदेखील ते दाबलं जातं आणि ज्याप्रकारे हे लोकं इतरांसमोर मांडतात, किंवा मनावर बिंबवतात ना त्याचा हा परिणाम आहे.
या आठवड्यात कोण राहील ? कोण जाईल ? हे ठरवेल त्यांचा गेम. कोण होईल कॅप्टन ? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ ? हे आज कळेल.