बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरामध्ये नुकतेच बिग बॉस यांनी सदस्यांवर विष - अमृत हे नॉमिनेशन कार्य सोपवले. जो सदस्य पेटारा उघडून त्यातील विष मिळवेल तो ठरवेल विरोधी टीममधील कोणता सदस्य नॉमिनेट होईल. तसेच सदस्याला सुरक्षित देखील करण्याची पॉवर सदस्यांना दिली गेली. याच टास्कमध्ये जिथे प्रसादने अमृता देशमुखला नॉमिनेट केले तिथे स्नेहलताने अमृता धोंगडे आणि अपूर्वामधून अमृता धोंगडेला नॉमिनेट केले. स्नेहलताने टास्क दरम्यान दिलेलं कारणं कुठेतरी अमृताला पटलं नाही. त्यामुळे ती नाराजी व्यक्त करताना दिसणार आहे.
अमृता तेजस्विनी समोर नाराजी व्यक्त करणार दिसणार आहे. आता नक्की तिच्या नाराजीचे काय कारण आहे हे आजच्या भागात कळलेच. काल अमृता देशमुख, अमृता धोंगडे, प्रसाद जवादे, विकास, त्रिशूल, किरण, समृध्दी घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले आहेत. अमृताचे म्हणणे आहे, मला माहिती आहे माझी लीडरशिप क्वॉलिटी निगेटिव्ह आहे की पॉझिटीव्ह आहे. निगेटिव्ह लोकांना तुम्ही सपोर्ट करता आहे आणि आम्हाला नाही करत याची काय गरज आहे तेजा.
तेजस्विनीचे म्हणणे आहे, कुठे सपोर्ट करतो आहे तिच्या निकषांवर ती पॉइंट ५ने उजवी पडली. तर, दुसरीकडे स्नेहलता अपूर्वा आणि अमृता देशमुख सोबत बोलताना दिसणार आहे. स्नेहलताचे म्हणणे आहे मला चुकीचे निर्णय नाही द्यायचे आहेत. ज्याने एखादा नॉमिनेशन मध्ये येईल. ते मला जे म्हणतात ना मी नाही घाबरत वैगरे ... घाबरण किंवा नाही घाबरण हा प्रश्न नाहीये. मी माझ्या निर्णयाबद्दल साशंक झाले. अमृता देशमुख म्हणाली, तुला आता जरी वाईट वाटत असेल तरी त्यांच्यासमोर बोलताना ठाम राहा कारण ते हो हो म्हणत आहेत पण ते कधीही हा विषय काढतील... स्नेहलताचे म्हणणे आहे, निकष चुकला नव्हता ना ? फक्त मी मांडताना वाक्य रचना चुकली आहे.