Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात रोज सदस्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद होत असल्याचं दिसत आहे. अनेकदा अगदी छोट्या छोट्या कारणांवरुन सदस्यांमध्ये भांडण झाल्याचं पाहायला मिळतं. आता आर्या आणि जान्हवीमध्ये घरातील साफसफाईवरुन वादाची ठिणगी उडाली आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओत जान्हवी आणि आर्या एकमेकांशी वाद घालत असल्याचं दिसत आहे. घरातील साफसफाईवरुन आर्या आणि जान्हवीमध्ये जुंपल्याचं दिसत आहे. गार्डन एरियामध्ये घरातील काही सदस्य असल्याचं दिसत आहे. तेवढ्यात जान्हवी आर्याला येऊन म्हणते, "तुला बाथरुम साफ करता येत नाही, भांडी घासता येत नाही, मग काय करता येतं तुला?". यावरुन नंतर दोघींमध्ये बाचाबाची होते. आर्या जान्हवीला उत्तर देत "तू स्वत: आधी स्वच्छ कर". त्यानंतर जान्हवीचा पारा चढतो. ती चिडून आर्याला म्हणते "मला घाण दिसली तर दिसली".
जान्हवीनंतर आर्याचाही पारा चढतो. ती म्हणते, "जान्हवी तू एकटी सांगतेय इथे मला...यावरुन कळतंय तू काय करतेय ते". त्यानंतर जान्हवी आर्याला म्हणते, "तुला घाणेरड्यासारख्या राहायचंय तर तसंच राहा आर्या".
दरम्यान, गेल्या आठवड्यात छोटा पुढारी घनश्याम दरवडेचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. तर या आठवड्यात संग्राम चौगुले बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेणार आहे. संग्रामच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे पुन्हा घरातील समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळणार आहे. घरात येताच संग्रामने अरबाज आणि निक्कीला टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे.