Join us

'बिग बॉस'च्या घरात Love Triangle! वैभव आणि परदेसी गर्लमध्ये जवळीक वाढली, आर्याची रडून रडून झाली 'अशी' अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 9:14 AM

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : वैभव इरिनाच्या प्रेमात अन् आर्या वैभवच्या प्रेमात! 'बिग बॉस'च्या घरात चाललंय तरी काय?

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या या नवीन पर्वात रोज नवे नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. केवळ बिग बॉसच नाही तर स्पर्धकही चाहत्यांना सरप्रायजेस देत आहेत. बिग बॉसच्या घरात एकत्र राहिल्यामुळे स्पर्धकांमध्ये जवळीक निर्माण होत असल्याचं याआधी आपण पाहिलं आहे. यंदाच्या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासूनच निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल या जोडीची चर्चा सुरू होती. आता मात्र बिग बॉसच्या घरात लव्ह ट्रँगल पाहायला मिळत आहे. 

बिग बॉसच्या घरात वैभव आणि परदेसी गर्ल इरिनामध्ये प्रेम फुलत असल्याचं दिसत होतं. परदेसी गर्ल इरिनाच्या प्रेमात रांगडा गडी पडलाय की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. आता मात्र घरात एक वेगळंच समीकरण पाहायला मिळत आहे. आता इरिना आणि वैभवमधील जवळीक पाहून आर्या मात्र अस्वस्थ झाली आहे. बिग बॉसच्या घरातील तिचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आर्या रडतना दिसत आहे. रडून रडून आर्याची वाईट अवस्था झाल्याचंही पाहायला मिळत आहे. 

आर्या वैभवला तिच्या फिलिंगबद्दल सांगताना व्हिडिओत दिसत आहे. "मला तू आवडतोस", असं आर्या वैभवला सांगते. त्यानंतर वैभव तिला म्हणतो, "पण, मी तर तुला असे काहीच इंन्टेशन्स दिलेले नाहीत". त्यावर आर्या त्याला "हो, पण मला तसं वाटूच शकत ना...", असं म्हणते. आता यावर इरिनाची काय प्रतिक्रिया असेल? घरातील या लव्ह ट्रँगलचा खेळावर काय परिणाम होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक 

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारमराठी अभिनेता