Join us

"माझ्याकडून चूक झाली, पण निक्कीने...", आर्याने सांगितलं नेमकं काय घडलं? बिग बॉसवर व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 2:18 PM

Bigg Boss Marathi Season 5 : घरातून बाहेर पडल्यानंतर आता आर्याने पहिल्यांदाच यावर भाष्य केलं आहे. आर्याने इन्स्टाग्रामवरुन लाइव्ह जात टास्कदरम्यान नेमकं काय घडलं, ते सांगितलं. तसंच तिने बिग बॉसवर नाराजी व्यक्त करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात आर्याने टास्कदरम्यान निक्कीवर हात उचलल्याने तिला घरातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. हिंसा करत घरातील नियमांचं उल्लंघन केल्यामुळे आर्याला बिग बॉसच्या घरातून एक्झिट घ्यावी लागली. घरातून बाहेर पडल्यानंतर आता आर्याने पहिल्यांदाच यावर भाष्य केलं आहे. आर्याने इन्स्टाग्रामवरुन लाइव्ह जात टास्कदरम्यान नेमकं काय घडलं, ते सांगितलं. तसंच तिने बिग बॉसवर नाराजी व्यक्त करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

आर्या काय म्हणाली?  

"मी वॉशरुममध्ये होते. निक्कीला अडवण्याचं काम आर्या करेल असा प्लॅन होता. निक्कीचे हात पकडल्यानंतर तिने बिग बॉस ही टच करतेय असं म्हणत ओरडायला सुरुवात केली. निक्कीला गेम खेळता येत नाही. तिला फक्त  बोलता येतं. जेव्हा ती वॉशरुममध्ये आली. तेव्हा मी अंकिताला म्हणाले की मी वॉशरुमचा दरवाजा बंद करून घेते. कारण अरबाज वगैरे बिझी होते. आजपर्यंत मी गेममध्ये समोरुन कधीच हिंसक झालेले नाही. निक्कीला मी मारल्याने तुम्ही मला सपोर्ट केलं की हे बरोबर आहे. पण, मला वाटतं नाही की हे माझ्याकडून व्हायला पाहिजे होते. कारण, मी निक्की नाहीये. 

 

पहिल्याच आठवड्यात निक्कीची नखं माझ्या गालावर लागलं होतं. तेव्हा काहीतरी होईल असं मला वाटलं होतं. नंतरही निक्कीच्या कॅप्टन्सीमध्ये मी तिला त्रास दिला. तेव्हा बेडरुममध्ये अंथरुण फेकत असताना जान्हवीने मला खेचलं. तेव्हा निक्कीने मला लाथ मारली. तिची आई म्हणते की माझी मुलगी मार खायला आलीये का? मला त्यांना सांगावसं वाटतं की काकू, तुमची मुलगी मार खायला आलेली नाही. पण दुसऱ्यांच्या मुलीही मार खायला इथे आलेल्या नाहीत.

मला जेव्हा सांगितलं की घराच्या बाहेर जा...तेव्हा मी काहीच बोलले नाही. कारण, माझ्याकडून चूक घडली होती. मी त्यांच्या निर्णयाचा आदर केला. तिथे मी बोलायला हवं होतं की नाही हे मला माहीत नाही. पण, याचा अर्थ निक्की बरोबर आहे असं नाही. पण, तेव्हा कोणी काहीच बोललं नाही. जे झालं ते झालं तुमचा सपोर्ट मला महत्त्वाचा आहे. 

निक्कीच्या कानशिलात लगावल्याने आर्याला घराबाहेर काढण्यात आलं. पण, चाहत्यांचा मात्र आर्याला फूल सपोर्ट मिळत आहे. आर्याने निक्कीबरोबर केलेल्या वागणुकीचं चाहते समर्थन करत आहेत.  

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसेलिब्रिटी