Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासूनच निक्की तांबोळी चर्चेत आहे. या आठवड्यात वर्षाताई कॅप्टन असल्यामुळे निक्की घरातील सदस्यांना त्रास देत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे पुन्हा घरात वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्याच आठवड्यात निक्की आणि अरबाजमध्ये मोठं भांडण झालं होतं. यावेळी संपूर्ण घराने अरबाजला पाठिंबा दिला होता. तर अभिजीत निक्कीच्या बाजूने होता. पण, आता वाद मिटल्यानंतर मात्र निक्की अभिजीतच्या विरोधात गेल्याचं पाहायला मिळत आहे.
अभिजीत आणि मी आता विरुद्ध खेळणार आहोत, असं निक्की अरबाजला म्हणाली होती. आता निक्की आणि अभिजीतमध्ये घरात वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. निक्की अभिजीतला म्हणते की "तू मला सांगू नको की मुद्दे कसे मांडायचे आणि शब्द कसे वापरायचे. तुलाही माहितीये की पहिल्या दिवसापासून मी या घरात माझे मुद्दे मांडतेय". त्यावर अभिजीत तिला म्हणतो, "पण मी तुला कधी म्हणालो की मु्द्दे मांडत नाही". त्यानंतर निक्की त्याला म्हणते, "तू मला तिथे म्हणाला की शब्द जपून वापर. मुद्दे कसे मांडशील". नंतर अभिजीत तिला "कारण, त्याआधी तू मला म्हणाली की तू शब्द बरोबर वापर. तुला कळत नाही का".
"ते मी तुला वेगळं म्हणाले होते. त्याचा तू चुकीचा अर्थ घेतला", असं निक्की म्हणते. नंतर अभिजीत चिडून म्हणतो, "ज्या गोष्टी तू बोलली ना मी त्यालाच उत्तर दिलंय. मी तुझ्यासाठी माझा एकही वेगळा शब्द वापरलेला नाही. तू बघ पूर्ण काढून". "तेवढा माझ्याकडे वेळ नाहीये", असं निक्की अभिजीतला म्हणाल्यावर त्याचाही पारा चढतो. तोदेखील निक्कीला म्हणतो, "माझ्याकडेही वेळा नाहीये".
दरम्यान, या आठवड्यात एकूण ७ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील सदस्यांनी घनश्याम दरवडे, सूरज चव्हाण, आर्या जाधव, अभिजीत सावंत, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, धनंजय पोवार यांना नॉमिनेट केलं आहे. गेल्या आठवड्यात वोटिंग लाइन्स बंद असल्यामुळे कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही. पण, या आठवड्यात मात्र एका स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे.