Join us  

Bigg Boss Marathi : अंकिता की निक्की? चांगला कॅप्टन कोण? अभिजीतने थेटच सांगितलं, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 3:53 PM

Bigg Boss Marathi Season 5 : टीम B मधील कोणाला टीम A सोबत रिप्लेस करशील? अभिजीत म्हणाला- "मला आर्याला काढून..."

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरातील समीकरणं रोज बदलताना दिसत आहेत. दोन्ही टीममधील काही सदस्यांमध्ये खटके उडाल्याचंही पाहायला मिळत आहे. दिवसागणिक घरात सदस्यांमधील समीकरणं बदलत असल्याने खेळ अधिक रंजक होत चालला आहे. शनिवारी रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर सदस्यांची शाळा घेतल्यानंतर आता रविवारी खास सरप्रायजेस स्पर्धकांना मिळणार आहेत. आज बिग बॉसच्या घरात दुर्गा मालिकेची टीम हजेरी लावणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. 

'कलर्स मराठी' वाहिनीवरील आगामी 'दुर्गा' या मालिकेची टीम आज भाऊच्या धक्क्यावर हजेरी लावणार आहे. दरम्यान दुर्गा मालिकेतील दुर्गा सदस्यांसोबत रॅपिड फायर खेळणार आहे. आजच्या भागात रॅपिड फायरमध्ये दुर्गा अभिजीत सावंतला विचारते,"'टीम B मधूल एका सदस्याला काढून टीम A मधल्या एका सदस्याला घ्यायचं असेल तर कोणाला काढाल आणि कोणाला घ्याल?". यावर अभिजीत आर्याला काढून इरिनाला घेईल असं उत्तर देतो. "अंकिता आणि निक्कीमध्ये सर्वोत्कृष्ट कॅप्टन कोण?" यावर अभिजीत अंकिताचं नाव घेतो. तर अभिजीतच्या मते टॉप 3 सदस्य हे निक्की, अंकिता आणि अरबाज हे आहेत.

या भाऊच्या धक्क्यामध्ये कंगना रणौत आणि श्रेयस तळपदेदेखील हजेरी लावणार आहेत. कंगना आणि श्रेयस त्यांच्या आगामी इमर्जन्सी या सिनेमाच्या निमित्ताने बिग बॉस मराठीमध्ये येत आहेत.  दरम्यान,या आठवड्यात अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोव्हा आणि आर्या जाधव हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी थेट नॉमिनेट झाले आहेत. आता या आठवड्यात कोणाचा प्रवास संपतो, हे रविवारी कळेल. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारमराठी अभिनेता