Bigg Boss Marathi Season 5 : जसजसा गेम पुढे जात आहे, तसतसं बिग बॉसच्या घरातील समीकरणं बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाऊच्या धक्क्यावर निक्कीपुढे टीम Aची पोलखोल झाल्यानंतर तिने एकटं खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता निक्की आणि अभिजीतमध्ये चांगलीच गट्टी जमल्याचं दिसत आहे. त्यात बिग बॉसने नव्या टास्कमध्ये निक्की आणि अभिजीतला एका जोडीत अडकवल्याने त्यांची मैत्रीही पक्की झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर अभिजीतचे मात्र निक्कीवरुन टीम B मधील सदस्यांबरोबर खटके उडत आहेत.
बिग बॉसच्या घरातील नवा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अभिजीत, निक्की आणि पॅडी एकमेकांबरोबर बोलताना दिसत आहेत. पॅडी अभिजीतला म्हणतो, "तुला कॅप्टन्सी मिळाल्यानंतर अरबाजसारखी परिस्थिती आली तर मला कॅप्टन्सी देशील ना?". त्यावर निक्की लगेच हसून म्हणते की "नाही नाही ...आता तर मी अभिजीतला हक्काने सांगू शकते की माझा विचार कर". त्यावर अभिजीत पॅडीला म्हणतो, "तुमच्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आहे". त्यानंतर पॅडी अभिजीतला "हो ते तर तू पहिल्या आठवड्यातच सिद्ध केलं आहेस. पण, ते प्रेम गेलं का आता?". पॅडीच्या या प्रश्नावर अभिजीत उत्तर देतो की "नाही...प्रेम गेलं नाही. पण, तुम्ही आता तसे राहिलेले नाही".
पुढे अभिजीत म्हणतो, "एखाद्या माणसाला तुम्हाला त्रास द्यायचा असेल. तर त्रास दिल्यावर गोष्ट संपते". "हा त्रास नाही...गमती जमती आहेत", असं पॅडी म्हणतो. त्यावर पुन्हा अभिजीत म्हणतो, "तुम्ही हिला पण त्रास देताय. आता फक्त आम्हा दोघांना टार्गेट केलं जातंय". त्यावर पॅडी अभिजीतला म्हणतो, "आपण जे वागलेलो असतो ना तेच परत मिळत असतं".
दरम्यान, पुरषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण, निखिल दामले यांच्यानंतर गेल्या आठवड्यात इरिना रुडाकोव्हा हिचा घरातील प्रवास संपला. आता यंदाच्या आठवड्यात घराचा कॅप्टन कोण होणार? आणि कोणत्या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार असणार, हे पाहावं लागेल.